ब्लड प्रेशर, शुगर आणि हृदयाच्या रुग्णांना देखील फायदेशीर आहे ‘अंजीर’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : अंजीर एक असे ड्रायफ्रूट आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ते जीवनसत्त्वे आणि खनिजांचे चांगले स्रोत आहे. अंजीरमध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जस्त, तांबे, मॅंगनीज आणि लोह भरपूर प्रमाणात असतात. ताज्या अंजीरमध्ये पुष्कळ पोषक तत्व असतात, मात्र त्यामध्ये कॅलरी कमी असतात, म्हणून हे निरोगी आहारासाठी एक उत्तम पर्याय आहे. एका अहवालानुसार पोषक तत्वांनी समृद्ध अंजीर हृदयापासून ते मधुमेह, बद्धकोष्ठता, अशक्तपणा, दमा आणि रक्तदाब नियंत्रित करतो. अंजीर आरोग्यासाठी फायदेशीर कसे आहे ते जाणून घेऊया.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास प्रभावी

वाळलेल्या अंजीरमध्ये पेक्टिन नावाचे सॉल्युबल फायबर असतात, जे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ओळखले जातात. यात ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड देखील असतात जे नैसर्गिक कोलेस्ट्रॉल सिंथेसिसला कमी करतात.

मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर

मधुमेह रूग्णांसाठी अंजीराच्या फळापेक्षा अंजीरची पाने अधिक फायदेशीर असतात कारण त्यांच्यात असे गुण असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियमित करण्यात मदत करतात. अंजीरची पाने खाल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून रोखले जाऊ शकते.

केस होतात चमकदार

अंजीरमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे, लोह इत्यादी पोषक तत्व असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात, तसेच केसांना चमकदार, गुळगुळीत आणि दाट बनविण्यात मदत करतात. अंजीरच्या लगद्याचा उपयोग एक उत्तम नैसर्गिक कंडीशनर म्हणून देखील केला जाऊ शकतो जे आपल्या केसांना कोमल, चमकदार आणि फ्रिज-फ्री बनवतात.

हृदयासाठी देखील फायदेशीर

अंजिरामुळे शरीरात चरबीची पातळी कमी होते, ज्यामुळे रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. जर आपण दररोज अंजीर खाल्ले तर आपल्याला कोरोनरी हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते.

बद्धकोष्ठता दूर होते

अंजीरमध्ये नैसर्गिक फायबर मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे यास बद्धकोष्ठतेवर उपचार म्हणून वापरले जाऊ शकते. हे फळ ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त, पचन संबंधित इतर समस्यांपासून आराम मिळविण्यात देखील मदत होते.

(डिस्क्लेमर: स्टोरीतील टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय व्यावसायिकाच्या सल्ल्याप्रमाणे घेऊ नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.)