अंक ज्योतिष : 3 मार्चला ‘या’ मुलांकाच्या व्यक्तींना नोकरीत मिळू शकतं ‘प्रमोशन’, जाणून घ्या ‘लकी’ नंबर आणि ‘शुभ’ रंग

पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक – 1
नवे मित्र बनवाल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. परोपकार करू शकता. नवीन घर किंवा गाडी खरेदी करू शकता. कुटुंबात छोट्या-मोठ्या घटना घडू शकतात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खुप धावपळीचा ठरेल.
शुभ अंक -15
शुभ रंग – हिरवा

अंक – 2
आज तुम्ही तोंडावर गोड बोलणार्‍या लोकांपासून सावध राहा. त्यांच्यापासून हानी होऊ शकते. आज तुमचे एखादे सामान चोरी होऊ शकते. मोठ्याप्रमाणात पैसा खर्च होईल. मेहनतीवर आज पाणी पडू शकते. अनुभवी लोकांची सोबत लाभदायक ठरेल. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे.
शुभ अंक-15
शुभ रंग- लेमन

अंक – 3
तुम्ही धार्मिक यात्रेवर जाऊ शकता. राजकीयदृष्ट्या सक्रिय होऊ शकता. जास्त खाणे-पिणे आरोग्य बिघडवू शकते. कुणालाही पैसे उधार देऊ नका.
शुभ अंक 4
शुभ रंग – निळा

अंक – 4
तुम्ही तुमच्या महत्वकांक्षाच्या पुर्ततेसाठी खुप मेहनत कराल. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. हीच वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे, अशावेळी भरपूर लाभ उचला. आज नव्या लोकांशी संपर्क होईल. आज तुमचा प्रवास निरर्थक ठरू शकतो.
शुभ अंक – 5
शुभ रंग – सफेद

अंक – 5
प्रेमी युगुल एकमेकांसोबत वेळ घालवतील. आपल्या प्रिय व्यक्तीसमोर कुटुंबियांकडे विवाहाचा प्रस्ताव ठेवणे तणावाचे कारण ठरू शकते. बँक बॅलन्स खर्चामुळे कमी होऊ शकतो. लक्ष देऊन नियोजन करा. मेहनत तुम्हाला निश्चित यश देईल.
शुभ अंक – 12
शुभ रंग – पिवळा

अंक – 6
तुमच्या दिनचर्येत थोडा बदल होऊ शकतो. तुमची योजना आजचा दिवस चांगला करेल. आजचे काम उद्यावर ढकलू नका. मुलांच्या शाळेतून तक्रारी येऊ शकतात.
शुभ अंक – 2
शुभ रंग – लाल

अंक – 7
आज तुमची योग्यता आणि क्षमतेचे लोक कौतूक करतील. ज्यामुळे आजच्या दिवसाचे तुमचे आकर्षण केंद्र असाल. भागीदाराशी संबंध सुधारतील. कामात नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस शुभ आहे. दूरचा प्रवास करू शकता.
शुभ अंक – 15
शुभ रंग – हिरवा

अंक – 8
आज तुम्ही राग आणि तोंडावर नियंत्रण ठेवा. विनाकारण वादविवाद आणि तर्क-वितर्क होऊ शकतात. संपत्ती संबंधी प्रकरणे मार्गी लागतील. नोकरी व कामकाजात एखादी चूक होऊ शकते, ज्यामुळे अधिकारी, बॉसचा ओरडा खावा लागेल.
शुभ अंक – 14
शुभ रंग – करडा

अंक – 9
बॉस आज खुश होऊन प्रमोशन देऊ शकतो. दाम्पत्य जीवनात आनंद येईल. आज जुने मित्र, नातेवाई, ओळखीच्या लोकांशी संपर्क होईल. आज सावध राहा. विरोधक, शत्रू त्रास देऊ शकतात. आर्थिक प्रकरणात सावध राहा.
शुभ अंक -12
शुभ रंग – नारंगी