अंक ज्योतिष : 14 फेब्रुवारीचा लकी नंबर आणि शुभ रंग

पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक- 1
सरकारी कर्मचार्‍यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. पदोन्नती होऊ शकते. दागिन्यांची खरेदी करू शकता. प्रवाससुद्धा होऊ शकतो. वडीलांसाबत सुरू असलेला वाद संपेल. फिरायला जाण्याची योजना आखू शकता.
शुभ अंक- 3
शुभ रंग- पिवळा
नाव अक्षर- ऊ च ढ

अंक- 2
संपत्तीबाबतचे वाद वाढू शकतात. उगाचच तर्कवितर्क लढवत बसू नका. सुखसमृद्धीसाठी तयार केलेल्या योजना वेग घेतील. पार्टी, सोहळ्यात व्यस्त रहाल. कुटुंबाशी भावनात्मक संबंध राहितील.
शुभ अंक – 5
शुभ रंग – लाल
नाव अक्षर – ज न

अंक – 3
मानसिक तणाव संपुष्टात येऊ शकतो. डोके शांत राहिल. नातेवाईकांकडून शुभवार्ता समजेल. कामात अडचणींना तोंड द्यावे लागेल. कुटुंबात आलेल्या अडचणी दूर होतील. लव पार्टनरसाठी दिवस रोमँटिक आहे.
शुभ अंक- 2
शुभ रंग- लेमन
नाव अक्षर- ए क छ द

अंक- 4
एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देऊ शकते. कोर्टाच्या कामात यश मिळू शकते. खर्‍या लोकांशी संपर्क वाढू शकतो. कामकाज आणि उपजिविकेच्या कामात व्यस्त रहाल. तरीही कुटुंबाला प्रेम द्याल. स्थितीत बदलांसह चांगल्या कालावधीची आशा आहे.
शुभ अंक – 10
शुभ रंग – लाल
नाव अक्षर – अ ख ग ट ध

अंक – 5
आज तुमचे आरोग्य बिघडू शकते. योग, व्यायाम प्राणायाम इत्यादीवर लक्ष द्या. व्यापारात टॅक्सची कटकट मार्गी लागू शकते. कुटुंबातील सर्व लोक तुम्हाला मान देतील. पती-पत्नी एकमेकांशी प्रेमाने राहतील.
शुभ अंक -2
शुभ रंग – व्हायलेट
नाव अक्षर – इ घ ठ

अंक- 6
तुमच्या वागण्यात आणि कार्यात सकारात्मक परिवर्तन आणाल. आत्मचिंतनाची वेळ आहे. पाहुणे येतील आणि त्यांच्या पाहुणचारात व्यस्त रहाल. नोकरीत उत्पन्नाचे आणखी स्त्रोत सापडतील. एखाद्या नातेवाईकाशी वाद होऊ शकतात.
शुभ अंक – 6
शुभ रंग – व्हायलेट
नाव अक्षर- ऋ झ

अंक – 7
सामाजिक आणि कल्याणकारी कामात सहभागी होऊ शकता. आज तुम्हाला एखादी भेट मिळू शकते. नवे मित्र बनवाल. लव पार्टनरची भेट होऊ शकते. व्यापाराच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. संततीमुळे अडचणी येऊ शकतात.
शुभ अंक – 42
शुभ रंग – सिलवर
नाव अक्षर – ण त थ

अंक – 8
व्यापारात नवीन कार्याची प्रेरणा मिळू शकते. आज राजकारण्यांशी भेट होऊ शकते. आज दुप्पट वेगाने कामाला लागाल. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे दुसर्‍यांचे भले होऊ शकते.
शुभ अंक – 5
शुभ रंग – सिल्वर
नाव अक्षर- उ ॠ ङ ड

अंक- 9
नाव अक्षर – ए ठ ढ ध
आज तुम्ही कामात बेफिकीरी केल्यास, शत्रूंना तुमच्या विरूद्ध बोलण्याची संधी मिळू शकते. तुम्ही तुमच्या कामाची जबाबदारी खुप गांभीर्याने घ्याल. जोडीदाराच्या संबंधात सहजता येईल.
शुभ अंक – 8
शुभ रंग – मॅजेन्टा