अंक ज्योतिष 15 मार्च : ‘हा’ ‘मुलांक’ असणार्‍यांच्या ‘मान-सन्माना’त होईल वाढ, ‘लकी नंबर’ आणि ‘शुभ रंग’ देईल ‘यश’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे. तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक- 1
आर्थिक आणि व्यापारीदृष्ट्या चांगले यश मिळेल. पहिल्यापेक्षा संपन्न व्हाल. भावनांमध्ये वाहून जाऊ नका. बेजबाबदारपणा पासून दूर राहा. स्वभावात नम्रता राहू द्या. कुटुंबाशी संबंध मधुर होतील.
शुभ अंक- 12
शुभ रंग- सफेद

अंक – 2
तुमच्या समविचारी लोकांशी ओळखी वाढतील. मान-सम्मानात वाढ होईल. संततीसोबत त्याच्या शाळेत अथवा कॉलेजात जाऊ शकता. कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त राहाल. भागीदारी आणि संबंधावर विचारपूर्वक निर्णय घ्या.
शुभ अंक- 10
शुभ रंग- जांभळा

अंक- 3
लोक तुमच्या बाबत उलट-सुलट बोलू शकतात. स्वभाव चिडचिडा होईल. बोलताना जपून बोला. कंजूस नसतानाही आर्थिक बाबींवर गांभिर्याने विचार कराल. आरोग्याबाबत चिंताग्रस्त राहाल. कौटुंबि समस्या सुटतील.
शुभ अंक- 10
शुभ रंग- हिरवा

अंक- 4
दिनचर्येत सुधारणा कराल. पैशाच्या प्रकरात पुढे जाल. पोटाची समस्या होऊ शकते. संपत्तीमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करा. सावध राहून कार्य करण्याची गरज आहे. मित्र चांगले सहकार्य करतील. एखाद्या सणाची तयारी कराल.
शुभ अंक- 5
शुभ रंग- हिरवा

अंक- 5
तुमचे आरोग्य बिघडू शकते. भविष्यातील योजनांवर पती-पत्नी मिळून विचार कराल. व्यापारातील स्थितीचे योग्य आकलन करण्याची गरज आहे. कुटुंबात आनंद येईल.
शुभ अंक- 5
शुभ रंग- लेमन

अंक- 6
पैसा कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. सहनशीलता भरपूर राहिल. दिवसाची सुरूवात जोरदार कराल. जवळचा प्रवास करू शकता. गुप्त शत्रूंमध्ये वाढ होऊ शकते. तरीसुद्धा तुमचा पराक्रम वाढेल. संततीकडून समाधान मिळेल.
शुभ अंक- 2
शुभ रंग- सिल्व्हर

अंक- 7
समाजात प्रतिष्ठा वाढेल. प्रवास सुखद आणि फलदायी होईल. थोडासा मानसिक तणाव राहिल. प्रत्येकाकडून काम करून घेण्यात यशस्वी व्हाल. अपरिचित व्यक्तीवर विश्वास ठेवण्याचा निर्णय चुकीचा ठरेल. प्रेमात स्थिती तुमच्या बाजूने राहिल.
शुभ अंक- 5
शुभ रंग- जांभळा

अंक- 8
आत्मविश्वास भरपूर असेल. सकारात्मक विचारांनी धन मिळवाल. घरातील कामाकडे लक्ष द्याल. आरोग्याच्या बाबतीत थोडे सावध राहा. जुना आजार त्रास देऊ शकतो. आई-वडील, मुले, नातेवाईक यांच्याशी संबंध मजबूत होतील. काम चातुर्याने पूर्ण कराल.
शुभ अंक- 15
शुभ रंग- नांरगी

अंक- 9
उत्पन्नापेक्षा खर्च होईल, यामुळे अडचणी वाढतील. खर्चासाठी योग्य बजेट बनवा. सामाजिक आवाका सीमित ठेवा. कुटुंब व मित्र आनंद देतील. बर्‍याच कालावधीपासून प्रलंबित सरकारी काम, कायद्याचा मुद्दा आदी मार्गी लागेल.
शुभ अंक- 3
शुभ रंग- पिवळा