अंक ज्योतिष 16 मार्च : ‘हा’ ‘मुलांक’ असणार्‍यांची ‘आर्थिक’स्थिती सुधारणार, सोमवारसाठी तुमचा ‘लकी नंबर’ आणि ‘शुभ रंग’ जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे. तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक-1
आजचा दिवस मेहनतीचा आहे. सायंकाळी थकवा जाणवेल. कुटुंबात अशांतता राहिल. खुप मेहनत करूनही दिवस तुमच्या बाजूने राहणार नाही. उच्च शिक्षणाचे योग आहेत. त्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक -16
शुभ रंग – सफेद

अंक-2
व्यापार किंवा नोकरीतून लाभ मिळेल. पैशांमध्ये वाढ होण्याचे योग आहेत. तुमचे आकर्षण आणि बुद्धी प्रभावी ठरेल. अचानक एखादी मोठी घटना घडू शकते. संततीकडून त्रास होऊ शकतो.
शुभ अंक-10
शुभ रंग- पिवळा

अंक – 3
आजचा दिवस चांगला आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळेल. स्पर्धेत भाग घेऊ शकता. याबाबतीत दिवस चांगला आहे. तुम्ही स्वतंत्र विचारांचे आहात. कुणाच्याही आधीन राहून काम करणे तुम्हाला पसंत येणार नाही. राजकारणातील जातकांसाठी दिवस चांगला आहे.
शुभ अंक-14
शुभ रंग – हिरवा

अंक – 4
मन चंचल आणि विचलित राहिल. वस्तू आपल्या हातून निसटत आहेत, असे वाटेल. व्यापार्‍यांना आज आळस जाणवेल. व्यापारात नवीन योजना आखल्या पाहिजेत. आज मन शांत ठेवा. अन्यथा कौटुंबिक वाद वाढतील.
शुभ अंक – 1
शुभ रंग – पिवळा

अंक-5
आज मन आनंदीत राहिल. कायदेशीर अडचणी कमी होतील. बंद पडलेला कारखाना सुरू होऊ शकतो. प्रेमविवाहासाठी घरच्यांशी बोलू शकता.
शुभ अंक – 2
शुभ रंग – सिल्व्हर

अंक-6
विद्यार्थ्यांना रिझल्टमधून खुशखबरी मिळू शकते. परदेश प्रवासाचे योग आहेत. प्रेमसंबंधात स्थिर-अस्थिरता राहिल. कोणत्याही कागदावर सही करण्यापूर्वी शांतपणे वाचून घ्या
शुभ अंक -16
शुभ रंग- सोनेरी

अंक – 7
आजच्या दिवशी ज्येष्ठांचे आरोग्य चांगले राहिल. काही जुन्या मित्रांची भेट होईल. आर्थिक संकट वडीलांच्या सहकार्याने दूर होईल. कुटुंबाच्या सहकार्याने पती-पत्नीमधील अडचणी दूर होतील. आर्थिकस्थितीत सुधारणा होईल.
शुभ अंक – 10
शुभ रंग – ग्रे

अंक – 8
नोकरीत बदलीची शक्यता आहे. पोटदुखी, पायदुखीमुळे त्रस्त होऊ शकता. थांबलेली सरकारी कामे मार्गी लागतील. सोबतच लाभ सुद्धा होऊ शकतो.
शुभ अंक – 32
शुभ रंग – निळा

अंक – 9
पती-पत्नी, बहिण-भाऊ यांच्यात वादाची शक्यता आहे. प्रेमविवाहासाठी तयारी करताना आपली कुंडलीसुद्धा जुळवा.
शुभ अंक -20
शुभ रंग -हिरवा