अंक ज्योतिष : 17 फेब्रुवारीचा लकी नंबर आणि शुभ रंग

पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक- 1
सरकारी कर्मचार्‍यांसाठी दिवस उत्तम आहे. बढती मिळू शकते. दागिने खरेदी करू शकता. प्रवाससुद्धा होऊ शकतो. वडीलांसोबत सुरू असलेला वाद संपुष्टात येऊ शकतो. पिकनिकला जाण्याची योजना करू शकता.
शुभ अंक- 3
शुभ रंग- पिवळा
नाव अक्षर- ऊ च ढ

अंक- 2
संपत्ती संबंधीचा वाद वाढू शकतो. उगाचच तर्कवितर्क लढवत बसू नका. सुखासाठी तयार केलेल्या योजना वेग घेतील. पार्टी व सोहळ्यात व्यस्त रहाल. कुटुंबाशी भावानात्मक ओढ कायम राहिल.
शुभ अंक- 5
शुभ रंग- लाल
नाव अक्षर- ज न

अंक- 3
मानसिक तनाव संपुष्टात येईल. डोकं शांत राहिल. नातेवाईकाकडून शुभवार्ता समजतील. कामात अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. कुटुंबात येत असलेल्या समस्या दूर होतील. लव पार्टनरसाठी रोमँटिक दिवस आहे.
शुभ अंक- 2
शुभ रंग- लेमन
नाव अक्षर- ए क छ द

अंक- 4
एखादी व्यक्ती धोका देऊ शकते. कोर्टाच्या कामात यश मिळू शकते. चांगल्या लोकांच्या संपर्कात येऊ शकता. कामात खुप व्यस्त रहाल, परंतु कुटुंबाला तरीही प्रेम द्याल. स्थितीत बदलांसह चांगली वेळ येणाची शक्यता आहे.
शुभ अंक- 10
शुभ रंग- लाल
नाव अक्षर- अ ख ग ट ध

अंक- 5
आज तुमचे आरोग्य बिघडू शकते. योग, प्राणायाम यावर लक्ष द्या. व्यापारात टॅक्ससंबंधीचे त्रास संपतील. कुटुंबातील सर्व लोक तुमचा मान राखतील. पती-पत्नी एकमेकांसोबत प्रेमाने राहतील.
शुभ अंक -2
शुभ रंग- व्हायलेट
नाव अक्षर- इ घ ठ

अंक- 6
तुम्ही तुमच्या व्यवहारात आणि कामात सकारात्मक परिवर्तन आणाल. आत्मचिंतनाची वेळ आहे. पाहुण्यांचे आगमन होईल, त्यांच्या पाहुणचारात व्यस्त रहाल. नोकरीत उत्पन्नाचे स्त्रोत मिळू शकतात. एखाद्या नातेवाईकाशी वाद होऊ शकतो.

शुभ अंक- 6
शुभ रंग- व्हायलेट
नाव अक्षर- ऋ झ

अंक- 7
सामाजिक कामात भाग घेऊ शकता. आज तुम्हाला एखादी भेट मिळू शकते. नवीन मिळ होतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. व्यापारानिमित्त प्रवास करावा लागेल. संततीकडून त्रास उत्पन्न होईल.
शुभ अंक- 42
शुभ रंग- सिल्व्हर
नाव अक्षर- ण त थ

अंक- 8
व्यापारात नवीन कामांसाठी प्रेरणा मिळू शकते. आज राजकीय व्यक्तिंशी भेट होऊ शकते. तुम्ही दुप्पट जोमाने कामाला लागाल. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे दुसर्‍यांचे भले होईल.
शुभ अंक- 5
शुभ रंग- सिल्व्हर
नाव अक्षर- उ ॠ ङ ड

अंक- 9
आज तुम्ही कामात वेपर्वाई केल्यास, शत्रूंना तुमच्या विरोधात बोलण्याची संधी मिळू शकते. तुम्ही तुमच्या जबाबदार्‍या गंभीर्याने पार पाडाल. जोडीदाराशी असलेल्या संबंधात सरलता आणि सहजता येईल.
शुभ अंक- 8
शुभ रंग- मजेन्टा
नाव अक्षर- क ग घ इ

You might also like