अंक ज्योतिष 17 मार्च : ‘हा’ ‘मुलांक’ असेल तर आज ‘लाभ ‘आणि ‘भाग्योदया’चा दिवस, जाणून घ्या तुमचा ‘लकी नंबर’ आणि ‘शुभ रंग’

पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे. तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक – 1
आज आरोग्य धोका देऊ शकते. चंचल मनाला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. वाहन हळू चालवा अन्यथा अपघाताची शक्यता आहे. कुटुंबातील अशांतता त्रासदायक ठरेल. प्रेमात अहंकार आणू नका.
शुभ अंक – 4
शुभ रंग – तपकिरी

अंक – 2
आजचा दिवस संघर्षाचा आहे. मात्र धैर्य तुम्हाला लक्ष्यापर्यंत पोहचवेल. कुटुंबाची साथ न मिळाल्याने मन दु:खी होऊ शकते. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन काम कराल, तर यश आवश्य मिळेल.
शुभ अंक – 12
शुभ रंग – राखाडी

अंक – 3
कुटुंबात वातावरण चांगले नसल्याने मन अशांत राहील. शारीरीक कामामुळे थकवा जाणवेल. राजकीय क्षेत्रातील जातकांवर आरोप होण्याची शक्यता आहे. सहकार्‍यांशी चांगले संबंध ठेवलेत तर लाभ होईल. गुडघेदुखी त्रास देऊ शकते.
शुभ अंक – 4
शुभ रंग – ग्रे

अंक – 4
विद्यार्थ्यांना कॉलेजात प्रवेश मिळू शकतो. एन्ट्रस परीक्षेत यश मिळणार आहे. अविवाहितांचे विवाह जुळू शकतात. पार्टनरशिपमध्ये व्यापराची आज सुरूवात करू नका. पुढ अडचणी वाढू शकतात.
शुभ अंक – 12
शुभ रंग – पिवळा

अंक – 5
आजच्या दिवशी अचानक एखादी दुर्घटना घडू शकते. शेयर, जुगारात गुंतवणूक तुमच्या बाजूने राहिल. सवयीमुळे लोक तुमच्या विरोधात जाऊ शकतात. घरात मुलांना वीजेचा शॉक लागण्याची शक्यता आहे. प्रेमात प्रिय व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे शरीरसुख देईल.
शुभ अंक – 16
शुभ रंग – ग्रे

अंक – 6
नोकरीतील परिवर्तनामुळे कुटुंबापासून दूर जाण्याचा योग आहे. मनातील नकारात्मक विचारांमुळे आत्मविश्वास कमी होईल. बाहेर खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते. योग्य ठिकाणी पैसे गुंतवल्यास फायदा होईल.
शुभ अंक – 21
शुभ रंग – लाल

अंक – 7
कौटुंबिक खर्च वाढेल. जुगार, म्युच्युअल फंड इत्यादीमध्ये तुमचे नुकसान होऊ शकते. आळस जाणवेल. कुटुंबातील भांडणांमुळे मन अशांत राहिल. आरोग्याच्या बाबतीत सावध राहावे लागेल.
शुभ अंक – 12
शुभ रंग – सफेद

अंक – 8
भावांमध्ये विरोधाची स्थिती निर्माण होऊ शकते. जमीन, संपत्तीमध्ये कुणीतरी धोका देऊ शकते. खर्च वाढेल. ज्यामुळे बचत कमी होईल. विचार करण्यात वेळ वाया घालवाल.
शुभ अंक – 4
शुभ रंग – जांभळा

अंक – 9
आज लाभ आणि भाग्योदयाचा दिवस आहे. जुन्या अडचणी दूर होतील. कोर्ट-कचेरीच्या केसचा निर्णय तुमच्या बाजूने लागेल. आजच्या दिवशी खुप आळस जाणवेल. वेळ वाया जाईल.
शुभ अंक – 14
शुभ रंग – लाल