अंक ज्योतिष 18 मे : ‘या’ लोकांसाठी आज केलेली गुंतवणूक ठरेल ‘लाभदायक’

पोलीसनामा ऑनलाइन टीम

मूलांक – 1
धनयोग आहे. दिर्घकालिन गुंतवणून लाभदायक ठरेल. राजकीय लाभासाठी एखादी योजना राबवा. मुलांच्या शैक्षणिक प्रवेशाची चिंता जाणवेल. संततीच्या सुखात वाढ होईल.
शुभ अंक – 12
शुभ रंग – लाल

मूलांक – 2
भविष्याच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल. धनलाभ होऊ शकतो. दागिने खरेदी करू शकता. एखादा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची इच्छा पूर्ण होईल.
शुभ अंक – 17
शुभ रंग – सोनेरी

मूलांक – 3
व्यापारात भागीदारीमुळे लाभ होईल. नोकरीत आत्मविश्वास जरूरी आहे. नकारात्मक गोष्टी समोर येतील, परंतु धाडसाने त्यातून पुढे जाल.
शुभ अंक – 12
शुभ रंग – लाल

मूलांक – 4
आजचा दिवस आनंददायी आहे. घरासाठी आवश्यक सामानाची खरेदी कराल. आज पूर्ण दिवस सोशल मीडिया, टीव्ही आणि चित्रपट पाहण्यात घालवाल.
शुभ अंक – 15
शुभ रंग – नारंगी

मूलांक – 5
सरकारकडून सन्मान मिळेल. तुमची लोकप्रियता वाढू शकते. आज असे काहीही करू नका, ज्यामुळे लोकांच्या नजरेत याल. आज एखादी चूक समोर येऊ शकते. बिनकामाच्या वस्तूंच्या खरेदीत पैसे खर्च होतील.
शुभ अंक – 25
शुभ रंग – हिरवा

मूलांक – 6
आजचा उत्साह जाणवेल. दिवस तुमच्यासाठी नव्या संधी घेऊन येईल. काही महत्वाचे निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. कुटुंबासह बाहेर जाऊ शकता. स्त्रीचे सहकार्य जीवनाची दिशा बदलू शकते.
शुभ अंक – 33
शुभ रंग – पिवळा

मूलांक – 7
वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. अनैतिक प्रेमसंबंधामुळे प्रतिमा बिघडू शकते. काही चुकीचे निर्णय घेऊ शकता. संपत्तीच्या प्रकरणात चांगली संधी मिळू शकते.
शुभ अंक – 19
शुभ रंग – सफेद

मूलांक – 8
तुमच्या वाणीतील नम्रता तुमच्यावर चांगला प्रभाव पाडेल. बॉस आणि सहकारी तुमच्यावर खुश राहतील. अभ्यासात रूची वाढेल. प्रिय व्यक्तीवर नाराज राहाल. रूसवा-फुगवा सुरूच राहील. इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल.
शुभ अंक – 35
शुभ रंग- हिरवा

मूलांक – 9
उतावळेपणाने कोणताही निर्णय घेऊ नका, नुकसान होऊ शकते. आज नवीन नाती तयार होतील. आईचे सहकार्य मिळाल्याने चिंता दूर होईल. घरासाठी आवश्यक सामान खरेदी कराल.
शुभ अंक – 29
शुभ रंग – केसरी