अंक ज्योतिष 19 मार्च : ‘हा’ मुलांक असणार्‍यांनी घ्यावी आरोग्याची ‘काळजी’, जाणून घ्या आजचा ‘लकी नंबर’ आणि ‘शुभ रंग’

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे. तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक – 1
मानसिक तणाव राहील. आरोग्याची काळजी घ्या. संपत्तीवरून वाद होऊ शकतात. तुमच्या मनातील गोष्टी आणि कामाचे नियोजन कुणालाही सांगू नका. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. शक्य होईल तोपर्यंत उधार पैसे आणि वस्तू घेऊ नका, अडचणी येऊ शकतात.
शुभ अंक – 26
शुभ रंग – हिरवा

अंक – 2
आज तुमचा उत्साह ओसंडून वाहिल. आत्मविश्वास कायम राहील. आईच्या प्रकृतीची काळजी वाटेल. मनावर तणाव असल्यासारखे वाटेल. तुमच्या वाहनात काही समस्या होऊ शकतात.
शुभ अंक – 15
शुभ रंग – सफेद

अंक – 3
मित्रांकडून नुकसान होऊ शकते. व्यापार किंवा नोकरीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रतिष्ठेवर आघात होऊ शकतो. मधुमेहच्या रूग्णांनी खास काळजी घ्यावी.
शुभ अंक – 6
शुभ रंग – पोपटी

अंक – 4
आज रागावर नियंत्रण ठेवा. विनाकारण कुणाशीही वाद घालू नका. लोक तुमच्याकडून राजकीय फायदा लाटण्याचा प्रयत्न करतील, थोडे सावध राहा.
शुभ अंक – 19
शुभ रंग – लाल

अंक – 5
तुमची वाणी मधुर राहील. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. पाहुणे घरी येण्याची शक्यता आहे. बहिण-भावामध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे.
शुभ अंक – 1
शुभ रंग – पिवळा

अंक – 6
आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. दिवस चांगला आहे. क्षमतेच्या बळावर बॉसला खुश करू शकता. शेयर मार्केट, जमीन-संपत्तीमध्ये पैसे विचारपूर्वक गुंतवा. डोळ्यांची समस्या वाढू शकते.
शुभ अंक – 24
शुभ रंग – नारंगी

अंक – 7
आज मन खुप दु:खी राहील. प्रिय व्यक्तीशी भांडण होऊ शकते. घरासाठी नवीन सामान खरेदी करू शकता. संपत्तीचे काम मार्गी लागू शकते.
शुभ अंक – 11
शुभ रंग – सफेद

अंक – 8
प्रसन्नतेचा दिवस आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दिवस खुप खास आहे. सर्व थांबलेली कामे पूर्ण होतील. इंटरव्ह्यूचा कॉल सुद्धा येऊ शकतो. वडीलांशी मतभेद होऊ शकतात.
शुभ अंक – 27
शुभ रंग – जांभळा

अंक – 9
दिवस सामान्य राहील. नवीन काम सुरू करणार असाल तर यश मिळेल. संपत्तीच्या प्रकरणात एखाद्या विश्वासू मित्राचा सल्ला घ्या. पोटाचा त्रास होऊ शकतो.
शुभ अंक – 10
शुभ रंग – तपकिरी