अंक ज्योतिष 20 मार्च : ‘हे’ 3 मुलांक असणार्‍यांना बढतीचे ‘योग’, तुमचा ‘लकी नंबर’ आणि ‘शुभ रंग’ जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे. तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

मूलांक 1
आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. व्यवसायासाठी अनुकूल वेळ आहे. छंद पूर्ण होतील. विद्यार्थ्यांचा निकाल चांगला लागेल. कामानिमित्त बाहेर जाऊ शकता. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. विवाहच्छुकांना प्रतिक्षा करावी लागेल.
शुभ अंक – 11
शुभ रंग – निळा

मूलांक 2
जमा पैशातून खर्च करा. मोठे ध्येय ठावून प्रयत्न करा. ऑफिसात बॉस खुश होईल. सरकारी कामाशी संबंधितांना प्रमोशनचे योग आहेत. परंतु, काही वरिष्ठ अधिकारी जळतील.
शुभ अंक -15
शुभ रंग – काळा

मूलांक 3
काम जास्त असल्याने आज थोडे अपसेट राहू शकता. नवविवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे. ज्यांना संततीची इच्छा आहे, त्यांची मनोकामना पूर्ण होईल. मीडियाशी संबंधीत जातकांना चांगली बातमी समजू शकते.
शुभ अंक – 6
शुभ रंग – पोपटी

मूलांक 4
आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी व्यवसायासंबंधी कोणतीही खुशखबर मिळू शकते. साहित्य आणि संगीतात रूची वाढेल. सरकारी क्षेत्रात काम करणार्‍या जातकांचे प्रमोशन होऊ शकते.
शुभ अंक – 3
शुभ रंग – तपकिरी

मूलांक 5
आर्थिक अडचणींमुळे घरातील वातावरण खराब होऊ शकते. परदेश यात्रेत अडचणी येऊ शकतात. भविष्यासाठीच्या योजनात घाई करू नका. नव्या कार्यासाठी सुरूवात करण्यास आजचा दिवस चांगला आहे.
शुभ अंक -10
शुभ रंग – नारंगी

मूलांक 6
नोकरीत आज यश मिळले. मुलांचे सहकार्य मिळाल्याने प्रसन्नता आणि उत्साह वाटेल. तुमच्या हाताखालचे कर्मचारी तुमच्या विरोधात जाऊ शकतात, परंतु संयम ठेवण्याची गरज आहे.
शुभ अंक- 20
शुभ रंग – निळा

मूलांक 7
आज कुटुंबाचे वातावरण सुखमय राहील. आईच्या आरोग्यासंबंधी काही अडचणीमुळे त्रास होऊ शकतो. विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी फॉर्म भरू शकतात. शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीवाल्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
शुभ अंक- 1
शुभ रंग – जांभळा

मूलांक 8
आज आपल्या क्षमतेच्या बळावर यश नक्की मिळवाल. डॉक्टर, नेता आणि न्याय यासंबंधी काम करणार्‍यांना प्रगतीची दिशा सापडेल. जुगारात पैसे लावण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे.
शुभ अंक – 32
शुभ रंग – सिल्व्हर

मूलांक 9
जोडीदाराशी वैचारिक मतभेद झाल्याने वाद-विवाद होऊ शकतात. आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवा, अन्यथा अनावश्यक समस्येला तोंड द्यावे लागेल विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचण येऊ शकते. परिश्रम करत राहा.
शुभ अंक- 6
शुभ रंग- डार्क ब्ल्यू