अंक ज्योतिष 22 फेब्रुवारी : मूलांकानुसार तुमच्यासाठी शनिवारचा लकी नंबर आणि शुभ रंग

पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

मूलांक – 1
समाजाशी संबंधीत कार्यात भाग घ्याल. धार्मिक कार्यात रूची वाढेल. तुम्ही जे कार्य कराल ते योग्य पद्धतीने पूर्ण होई. पत्नीच्या सहकार्यामुळे कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. धन वाढवायचे असेल तर ते योग्यपद्धतीने गुंतवा. नवे पर्याय शोधा.
शुभ अंक – 4
शुभ रंग – हिरवा

मूलांक – 2
पार्टनरशिपमध्ये व्यापार करण्यासाठी दिवस चांगला आहे. मनोरंजन क्षेत्रातील लोकांसाठी दिवस चांगला आहे. विनाकारण वाद-विवाद करू नका. छोटा प्रवास करू शकता. प्रवास लाभदायक ठरेल. तुमच्याविवेकामुळे मार्गात येणार्‍या अडचणी दूर करण्यात सक्षम बनाल.
शुभ अंक-11
शुभ रंग- गडद निळा

मूलांक – 3
घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खरेदी करू शकता. वाहन लक्ष देऊन चालवा. कुटुंबात एखाद्या नातेवाईबाबत वाईट घटना घडू शकते. संततीच्या शिक्षणावर पैसे खर्च होऊ शकतात.
शुभ अंक – 34
शुभ रंग – हिरवा

मूलांक – 4
घरात सुख-शांतीचे वातावरण राहिल. संतती पाहिजे असणार्‍या जातकांना आनंदवार्ता समजेल. विनाकारण होणार्‍या खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना खुप मेहनत करावी लागेल. बँकेकडून वाहन किंवा घरासाठी कर्ज घेऊ शकता.
शुभ अंक – 14
शुभ रंग – लाल

मूलांक – 5
वाईट संगतीपासून दूर रहा. ऑफिस किवां व्यापारात जे लोक तुमच्यावर जळतात, ते तुमच्या विरूद्ध जाऊ शकतात. सरकारी नोकारीची संधी मिळेल. आज तुम्हाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे. या अंकाच्या व्यक्ती आज भाषण कला, इंटरव्ह्यूमध्ये भाग घेण्याची शक्यता आहे.
शुभ अंक – 4
शुभ रंग – पोपटी

मूलांक – 6
शत्रूंपासून सावध रहा. कर्मचारी आणि सहकार्‍यांच्या हालचालींवर पूर्ण लक्ष ठेवा. व्यावसायासंबंधी समस्या समोर येऊ शकते. प्रेमप्रसंग आणि सोशल नेटवर्किंग साइट्सपासून दूर रहा. जोडीदाराला कार्यक्षेत्रात सुवर्णसंधी मिळू शकते.
शुभ अंक – 12
शुभ रंग – जांभळा

मूलांक – 7
विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. नातेवाईकांकडून कोणत्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. कटुंबातील सुखशांतीमध्ये तुमची भूमिका महत्वाची राहिल. प्रवासाची आवड असल्यास ती पूर्ण होईल.
शुभ अंक – 16
शुभ रंग – तपकिरी

मूलांक – 8
इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी खर्च करू शकता. पती-पत्नीचे संबंध सुधारतील. समज वाढेल. नवीन लोकांशी संपर्क होऊ शकतो. तुमचे शिष्टपूर्ण व्यवहार आणि व्यक्तिमत्वामुळे लोकांशी चांगले संबंध निर्माण होतील.
शुभ अंक -3
शुभ रंग – पिवळा

मूलांक – 9
दिवस सामान्य जाईल. संततीच्या बाबतीत चिंतेत रहाल. मशीनरी इत्यादी उपकरण खराब झाल्याने कामात अडथळा येऊ शकतो. जास्त कामामुळे तणाव वाढू शकतो. आज भावनांवर निर्यत्रण ठेवणे जरूरी आहे. कौटुंबिकदृष्ट्या आज वेळ तुमच्या बाजूने आहे.
शुभ अंक – 12
शुभ रंग – लाल

You might also like