अंक ज्योतिष : 24 फेब्रुवारीला मुलांकानुसार ‘हा’ आहे तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग

पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे

अंक – 1
तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. स्वत:वर नियंत्रण ठेवून आपली कामे करण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराकडून भरपूर सहकार्य व प्रेम मिळेल. कुटुंबाची जबाबदारी पार पाडाला आणि त्यांच्याकडे पूर्ण लक्ष द्याल.
शुभ अंक -9
शुभ रंग – लाल

अंक – 2
मनात सकारात्मक विचार राहतील. तुम्हाला आशेचे किरण दिसतील. तुमच्या आकर्षणाचा लाभ उठवा. नोकरीतील कामे पूर्ण होतील. कुटुंबात एखाद्या सदस्याची प्रकृती बिघडू शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे.
शुभ अंक-14
शुभ रंग- पिवळा

अंक – 3
एखाद्या जुन्या मित्राशी फोनवर चर्चा होऊ शकते. मन स्वार्थी होऊ शकते, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा आणि प्रतिमा बिघडू शकते. परंतु, कुटुंबाचे संपूर्ण सहकार्य तुमच्या सोबत असेल.
शुभ अंक-15
शुभ रंग – सफेद

अंक – 4
संततीकडून एखादी खुशखबर मिळू शकते. आज तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहिल. परंतु, स्वत:वर नियंत्रण ठेवा. चांगले परिणाम दिसून येतील. अभ्यासासंबंधीची कामे गतिमान होतील. कौटुंबिक समस्या निर्माण होऊ शकते. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस सामान्य आहे.
शुभ अंक – 10
शुभ रंग – निळा

अंक – 5
आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. उत्पन्न कमी होऊ शकते. आरडाओरड करून काम करू नका. बेपर्वाई घातक ठरू शकते. शरीरीक आणि मनसिकदृष्ट्या मध्यम अनुभव येईल. अविवाहितांच्या विवाहाचे काम पुढे सरकेल.
शुभ अंक – 3
शुभ रंग – निळा

अंक – 6
एखाद्या समस्येमुळे मन अशांत राहिल. प्रिय व्यक्तीशी भांडण होऊ शकते. देवपूजेत मन लागणार नाही. पत्नीशी वाद होऊ शकतो.
शुभ अंक – 26
शुभ रंग – क्रीम

अंक – 7
कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. पती-पत्नीमध्ये मतभेद वाढू शकतात. तुमचे पूर्ण लक्ष्य तुमच्या ध्येयाकडे राहिल. अनोळखी व अपरिचित व्यक्तींवर अजिबात विश्वास ठेवू नका. स्वभावात चढ-उतार राहिल. ताप येण्याची शक्यता आहे.
शुभ अंक-  34
शुभ रंग – तपकिरी

अंक – 8
पैसे जास्त खर्च होतील. आज तुमचा वेळ धार्मिक कामात जाईल. सहकार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. वैवाहिक जीवनात काही कारणामुळे पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. मुलांवर या वादाचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्या.
शुभ अंक – 6
शुभ रंग – सिल्व्हर

अंक – 9
जर नवीन कार्य सुरू करायचे असेल तर आजचा दिवस शुभ आहे. पैसे जास्त खर्च होतील. व्यवसायातील अडथळे कमी होतील. आज तुम्हाला सरकारकडून लाभ मिळू शकतो. प्रवासात राहिल्याने खर्चात वाढ होईल.
शुभ अंक – 12
शुभ रंग – सफेद

You might also like