अंक ज्योतिष : 26 फेब्रुवारीचा मूलांकानुसार तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग

पोलीसनामा ऑनलाइन  – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक – 1
बॉस आज खुश होऊन प्रमोशन देऊ शकतो. दाम्पत्य जीवनात आनंद लाभेल. आज जुने मित्र, नातेवाई आणि ओळखीच्या व्यक्तींशी संपर्क होऊ शकतो. सावध रहा, विरोधक किंवा शत्रू त्रासदायक ठरू शकताता. आर्थिक प्रकरणात सावध रहा.
शुभ अंक -12
शुभ रंग – क्रीम

अंक – 2
तुमच्या मेहनतीमुळे व्यापारात प्रगती होऊ शकते. आपल्या जबाबदार्‍यांपासून दूर जाऊ नका, त्या पार पाडा. यामुळे जीवनाचा दर्जा अधिक चांगला होईल. कुटुंबात पैशांमुळे अशांतता राहू शकते. अपघातापासून सावध रहा, वाहन सावधगिरीने चालवा.
शुभ अंक-16
शुभ रंग- सफेद

अंक – 3
जीवनात संघर्ष येतील, परंतु तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाच्या बळावर पुढे जाल. आरोग्य बिघडू शकते. तुम्ही बनवलेल्या योजनांमुळे जीवनात प्रगती येईल. बँकेकडून कर्ज घ्यायचे असल्यास आज घेऊ शकतो.
शुभ अंक- 42
शुभ रंग – निळा

अंक – 4
अचानक कामे मार्गी लागतील आणि बिघडतील सुद्धा. कोणतेही कार्य विचार न करता सुरू करू नका. प्रवासाचा योग आहे. बरेच काही बदलू शकते.
शुभ अंक – 15
शुभ रंग – पिवळा

अंक – 5
विवाह इच्छूकांचे विवाह जुळतील. अनुभवी आणि वरिष्ठ व्यक्तींच्या अनुभवाचा लाभ मिळेल. आज अडचणी कमी होतील. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल. नोकरदारांसाठी दिवस सामान्य आहे.
शुभ अंक – 6
शुभ रंग – सफेद

अंक – 6
सरकारी नोकरी किंवा हॉटेलमध्ये काम करणार्‍या जातकांना नवीन ऑर्डर मिळतील. आज तुम्ही पार्टी किंवा समारंभामध्ये भाग घेऊ शकता. उत्साह आणि उर्जा भरपूर राहिल. पती-पत्नीत खर्चावरून वाद होतील. इन्फेक्शन होऊ शकते. पाणी उकळून प्या.
शुभ अंक – 4
शुभ रंग- पिवळा

अंक – 7
कुटुंबाला अडचणींना तोंड द्यावे लागेल. आर्थिक स्थिती कमजोर होऊ शकते. काम पूर्ण करूनच थांबाल. व्यापारात मंदीचा त्रास होईल. कोर्ट-कचेरीच्या फेर्‍या माराव्या लागतील.
शुभ अंक- 13
शुभ रंग – लाल

अंक – 8
थांबलेली कामे गतीमान होतील. आनंदाने कामे करा. आजचा दिवस लाभदायक नाही. काही अशा लोकांशी भेट होईल जे पाय ओढायचा प्रयत्न करतील.
शुभ अंक -6
शुभ रंग – ग्रे

अंक – 9
कुटुंबात संतती संबंधी एखाद्या शुभकार्याची स्थिती राहिल. बॉस आणि अधिकार्‍यांशी संबंध बिघडू शकतात. प्रवासात यश मिळणार नाही. वाहन खराब झाल्याने समस्यांना तोंड द्यावे लागेल. विनाकारण होणार्‍या खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक – 15
शुभ रंग – करडा