अंक ज्योतिष : 27 फेबुवारीसाठी मुलांकानुसार तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग

पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक – 1
या अंकाच्या व्यक्ती संशोधन, शोध, तपासात व्यस्त राहतील. संपत्तीमध्ये गुंतवणुकीच्या प्रकरणात स्थिती तुमच्या बाजूने राहिल. नोकरीत प्रगती होईल. आजचा दिवस सामान्य राहिल.
शुभ अंक -10
शुभ रंग – लाल

अंक – 2
आज तुमच्या चिंता कमी होतील आणि विशेषकरून मुलांकडून काही शुभवार्ता समजतील. व्यापार आणि नोकरीत प्रगती होईल. हुशार व्यक्ती तुमच्या बुध्दीमत्तेची परीक्षा घेऊ शकते. लक्ष्मीचे आगमन झाल्याने घरात आनंद येईल.
शुभ अंक- 24
शुभ रंग- जांभळा

अंक – 3
आज तुमचा किमती वेळ व्यर्थ घालवू नका. प्रवासात व्यस्त राहिल्याने कुटुंबापासून दूर राहाल. जोडीदाराशी निकटता वाढेल. साहित्याशी संबंधीत लोक ज्ञानार्जनासाठी प्रवास करू शकतात.
शुभ अंक – 22
शुभ रंग – हिरवा

अंक – 4
काही चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे तुम्हाला वाईट सवय लागू शकते. त्यांच्यापासून दूर राहा. आजचा दिवस धनप्राप्तीचा आहे. कुटुंबासोबत सायंकाळी फिरण्यासाठी जाऊ शकता. आप्तांबाबत तुमच्या मनात जे गैरसमज होते ते दूर होतील.
शुभ अंक- 41
शुभ रंग – करडा

अंक – 5
तुमची मनमानी तुम्हाला आज महागात पडेल. निरर्थक कामात वेळ बरबाद करू नका. ब्लड प्रेशर हाय होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने वागा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
शुभ अंक – 4
शुभ रंग – पिवळा

अंक – 6
आज तुम्ही खुप मेहनत कराल. पण सकरात्मक परिणाम मिळणार नाही. पैसा येईल पण टीकणार नाही. पती-पत्नीमधील मतभेद संपतील.
शुभ अंक – 2
शुभ रंग – काळा

अंक – 7
आज तुम्ही व्यापारात कठीण निर्णय घ्याल, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला फायदा होईल. नव्या नोकरीसाठी अर्ज करू शकता. वैवाहिक जीवनात साचलेपणा आल्याने पती-पत्नीमध्ये भांडण होऊ शकते.
शुभ अंक- 42
शुभ रंग – निळा

अंक – 8
आज तुम्ही पार्टी किंवा समारंभात भाग घ्याल. उत्साह आणि उर्जा भरपूर राहिल. पती-पत्नीमध्ये खर्चावरून वाद होईल. सरकारी नोकरी किंवा हॉटेल व्यवसायातील लोकांना नव्या ऑर्डर मिळतील.
शुभ अंक – 10
शुभ रंग – जांभळा

अंक – 9
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. घरात लक्ष देऊ शकाल. आरोग्य चांगले राहाणार आहे. हिंमत आणि लक्षपूर्वक काम करण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक प्रकरणात जोडीदाराची साथ मिळेल. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस चांगला आहे.
शुभ अंक – 10
शुभ रंग – सफेद

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like