अंक ज्योतिष : 28 फेब्रुवारीसाठी मुलांकानुसार तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग

पोलीसनामा ऑनलाइन : –

अंक – 1
आज तुमचा अमुल्य वेळ निरर्थक कामात घालवू नका. प्रवासात असल्याने कुटुंबापासून दूर राहाल. जोडीदाराशी जवळीक आणि प्रेम वाढेल. साहित्याशी संबंधीत लोक ज्ञानार्जन आणि विद्याध्ययनात व्यस्त राहतील.
शुभ अंक -13
शुभ रंग – लाल

अंक – 2
संगीत, साहित्य आणि कला आज तुम्हाला आकर्षित करेल. नवी पुस्तके, सीडी, इत्यादी खरेदी करू शकता. खुप कालावधीपासून रखडलेले काम एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होईल. घरातील चिंतापासून सुटका होईल. कुटुंबाच्या जबाबदार्‍या पार पाडाल.
शुभ अंक- 3
शुभ रंग- हिरवा

अंक – 3
आज तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. चिंतत, मनन कराल. मन मेडीटेशनमध्ये लागेल. मित्र व सहकार्‍यांना पूर्ण सहकार्य कराल. धनप्राप्तीची शक्यता आहे. परंतु आज मोठी रिस्क घेऊ नका.
शुभ अंक – 4
शुभ रंग – निळा

अंक – 4
तुम्हाला व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. हात, पाय आणि डोक्याला दुखापत होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही गाडी चालवत असाल तर सावधगिरीने चालवा. खरेदीसाठी शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. आज तुम्ही फॅमिलीवर जास्त खर्च कराल.
अंक – 12
शुभ रंग – सोनेरी

अंक – 5
आज तुम्ही चाड्या करणार्‍या लोकांपासून सावध राहा, अन्यथा हानी होऊ शकते. आर्थिक तोटा होऊ शकतो, यामुळे मोठ्याप्रमाणात पैसे खर्च होऊ शकतात. मेहनतीवर पाणी पडू शकते. अनुभवी व्यक्तींच्या सोबत राहा. प्रेमबंधात आजचा दिवस महत्वपूर्ण राहिल
शुभ अंक – 12
शुभ रंग – गुलाबी

अंक – 6
तुम्ही तुमच्या महत्वकांक्षांसाठी खुप मेहनत कराल. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहिल. वेळ अनुकूल आहे, भरपूर लाभ करून घ्या. नव्या लोकांशी संबंध येतील. आज तुमचा प्रवास निरर्थक ठरू शकतो.
शुभ अंक – 1
शुभ रंग – नारंगी

अंक – 7
तुम्ही धार्मिक कामानिमित्त प्रवास करू शकता. राजकीय क्षेत्रात असल्यास सक्रिय राहू शकता. जास्त खाण्या-पिण्यामुळे आरोग्य बिघडू शकते. कुणालाही पैसे उधार देऊ नका, परत मिळण्याबाबत शंका आहे.
शुभ अंक- 42
शुभ रंग – पोपटी

अंक – 8
आजच्या दिवशी नवे मित्र होतील. प्रेमसंबधात आजाचा दिवस चांगला जाईल. परोपकारी कार्य करू शकता. नवे घर किंवा वाहन खरेदी करू शकता. कुटुंबात छोट्या-छोट्या घटना होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी धावपळीचा दिवस आहे.
शुभ अंक -14
शुभ रंग – चॉकलेटी

अंक – 9
आजच्या दिवशी पैसे व्यर्थ खर्च करू नका, यापेक्षा म्यूचल फंडमध्ये गुंतवा. विवाहाच्या कार्यक्रमात व्यस्त राहू शकता. विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागेल. कुटुंबातील सदस्य तुमच्यावर नाराज होऊ शकतात. त्यांच्या बोलण्याला महत्व द्या.
शुभ अंक -42
शुभ रंग – जांभळा