अंक ज्योतिष : 29 फेब्रुवारीसाठी मुलांकानुसार तुमचा ‘लकी’ नंबर आणि ‘शुभ’ रंग

पोलीसनामा ऑनलाइन

अंक – 1
आज तुमचे भाग्य साथ देणार आहे. आज लाभाच्या दिवशी नवे घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता ऊर्जेचा स्तर वर राहिल. प्रवासासाठी जाऊ शकता. जोडीदाराकडून लाभपूर्ण योगदान मिळेल. शेयर बाजारात गुंतवणूक करू शकता. तुमचे आरोग्य सामान्य राहिल. वडीलांचे आरोग्य बिघडल्याने मानसिक ताण वाढवेल.
शुभ अंक- 5
शुभ रंग – लाल

अंक – 2
व्यापारात मोठी ऑर्डर मिळेल. पती-पत्नीमध्ये गैरसमज वाढतील. एकमेकांबद्दल तक्रारी वाढतील. दिवस कामात जाईल, आराम करण्यासाठी वेळ मिळणार नाही. आईच्या आशीर्वादोन नवे कार्य सुरू केल्यास यश मिळेल.
शुभ अंक- 23
शुभ रंग- सफेद

अंक – 3
रोजी रोटी कमावण्यासाठी योग्य संधी मिळतील. सतर्क राहा, कटकारस्थानाचे बळी होऊ शकता. शत्रूंपासून सावध राहा. परदेशात जाण्याचा योग आहे.
शुभ अंक- 15

अंक – 4
नेत्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. जे विवाहासाठी इच्छूक आहेत, त्यांना थोडी वाट पाहावी लागेल, नवीन संबंध निर्माण होऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास आणि विवेकाने तुम्ही जे काम आज कराल त्यामध्ये यश मिळेल.
शुभ अंक- 19
शुभ रंग- नारंगी

अंक – 5
दिवस उत्तम आहे. तुम्ही जास्त स्पष्टवक्ते असल्याने मोजून-मापून बोला. भावना प्रबळ राहतील. पत्नीची साथ लाभेल. आपल्या कामात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा, प्रगती होईल. रागापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आज मनोरंजन आणि रोमान्सचा दिवस आहे, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल.
शुभ अंक- 26
शुभ रंग- मरून

अंक – 6
दिवसाच्या सुरूवातीला टेन्शन राहिल. बहिण-भावामध्ये वाद होऊ शकतो. तरूण-तरूणींचा प्रेमभंग होऊ शकतो. पोटाच्या त्रासाने त्रस्त होऊ शकता. एखादे अडकलेले सरकारी काम वेग घेऊ शकते. आजच्या दिवशी तुमच्या घरात मंगलकार्य होऊ शकते.
शुभ अंक- 22
शुभ रंग- ग्रे

अंक – 7
तुम्ही बुद्धिमान व्यक्ती आहात. विचारपूर्वक आज आपल्या भविष्याचे निर्णय घ्या. आज जास्त खर्च होऊ शकतो. नातेवाईकांकडून चुकीचा सल्ला मिळू शकतो. सावध राहा. प्रत्येक विषयाचे आकलन स्वत: करा.
शुभ अंक- 11
शुभ रंग- पिंक

अंक – 8
परिश्रमाने तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. आज मनोरंजनात मन रमेल. दुर्घटना घडण्याचा धोका आहे. वाहन हळू चालवा. आज प्रेमासाठी महत्वाचा दिवस आहे, नवीन प्रेमसंबंध होतील, जुने संबंध अधिक प्रबळ होतील. मुलाच्या सहकार्याने व्यापारात अधिक प्रगती होईल.
शुभ अंक- 18
शुभ रंग- पोपटी

अंक – 9
आर्थिक लाभ होण्याचा पूर्ण योग आहे. वेळ अनुकूल आहे. तुमचे छंद पूर्ण होतील. विद्यार्थ्यांचा निकाल अनुकूल लागेल. कामानिमित्त बाहेर जाऊ शकता. मानसिकदृष्ट्या भिती, तणावातून मुक्त होऊ शकता.
शुभ अंक- 1
शुभ रंग- जांभळा