Ankita Bhandari | Facebook फ्रेंडमुळे उलघडले अंकिता भंडारीच्या हत्येचे रहस्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंकिता भंडारी (Ankita Bhandari) मृत्यूचे कोडे अखेर उलघडले आहे. फेसबुकवर (Facebook) असलेल्या मित्राच्या मदतीने पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यात पुलकित आर्य (Pulkit Arya), सौरभ (Saurabh) आणि अंकिता गुप्ता (Ankita Gupta) अशा आरोपींना अटक करण्यात आली आहे.अटक केल्यानंतर यांना खाकी वर्दी दाखवल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.आरोपींनी पोलिसांना त्यादिवशी घडलेली संपूर्ण घटना सविस्तरपणे सांगितली. (Ankita Bhandari)

काय घडले नेमके?

18 सप्टेंबर रोजी या तिन्ही आरोपी अंकिताला ऋषिकेशला फिरायला नेण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेले. ऋषिकेश एम्सला बैराज मार्गे त्यांनी प्रवास केला. तेथे चौघांनी थांबून खूप वेळ बोलण्यात व्यस्त होते. त्यानंतर परत येताना बैराज पोस्टवर चिला कालव्यावर ही लोकं थांबली होती. चीला कालव्याच्या इथे अंकिता गुप्ता, सौरभ आणि पुलकित आर्य हे दारू प्यायले होते. ही संपूर्ण बाब अंकिता भंडारी ही लांब थांबून पाहत होती. थोड्यावेळाने पुलकित आणि अंकिता यांच्यात वाद सुरू झाला. हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे चालणारे अनधिकृत घटनांची माहिती कुटुंबीयांना देणार असल्याची सांगितले. याचा पुलकीतला राग आला आणि त्यांच्यात मोठे भांडण सुरू झाले. इतक्यात अंकिताने पुलकीतचा फोन कालव्यात टाकून दिला. काही वेळाने वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. पुलकीतने रागात अंकिताला कालव्यात टाकून दिले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अंकिता पाण्यात बुडू लागली आणि त्यातच तिचा मृत्यू (Death) झाला. (Ankita Bhandari)

अशा पद्धतीने झाला खुलासा

अंकिताच्या फेसबुक (Ankita Bhandari Facebook) मित्राच्या सहाय्याने ही केस सोडवण्यास पोलिसांना मदत झाली. अंकिताची जम्मूमधील पुष्प सोबत मैत्री झाली होती. पुष्प हा या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी ऋषिकेश ला पोहोचला. यावेळी त्यांनी अंकिताच्या घरच्यांना काल रात्री आठच्या सुमारास अंकिताबरोबर बोलणे झाल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले ‘अंकिताने त्याला सांगितले की ती अडकली आहे. रिसॉर्ट मालक आणि व्यवस्थापकाने ग्राहकांशी शारीरिक संबंध (Physical relationship) ठेवण्यास दबाव टाकल्याचे तिने सांगितले. त्याचबरोबर पुलकितने दारूचा नशेत अंकिताचा विनयभंग (molestation) देखील केला आहे. यानंतर पुष्पने अंकिताला साडेआठच्या सुमारास पुन्हा फोन केला मात्र तिचा फोन बंद होता. त्यानंतर त्याने पुलकितला फोन केला असता पुलकितने अंकिता रूम मध्ये झोपल्याचे सांगितले. तर दुसऱ्या दिवशी पुलकित आर्यचा ही फोन बंद झाला होता.

Web Title :-   Ankita Bhandari | facebook opens the secret of receptionist ankita bhandaris murder 3 people arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

LIC च्या या प्लानमध्ये रोज 73 रुपये जमा करून मॅच्युरिटीवर मिळवा पूर्ण 10 लाख रुपये, जाणून घ्या डिटेल्स

Body Detoxification Food | बॉडी डिटॉक्स करतो गुळ, जाणून घ्या आरोग्यासाठी कशाप्रकारे लाभदायक

Eknath Khadse | एकनाथ खडसेंच्या भाजप घरवापसीच्या चर्चांना उधाण ! खडसे फडणवीसांचे नाव घेत म्हणाले – ‘हे जेव्हा गोधडीत…’