सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात ! अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. पवित्र रिश्ता मालिकेत त्याच्यासोबत काम करणारी आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिलाही अनेकांनी ट्रोल केलं होतं. सुशांतच्या चाहत्यांचा राग नेहमीच वाढताना दिसला आहे. अंकिताचा बॉयफ्रेंड विकी जैन यावरदेखील अनेकांनी निशाणा साधला होता. त्यालाही गेल्या काही दिवसांपासू ट्रोल केलं जाताना दिसत आहे.

सतत होणाऱ्या ट्रोलिंगनंतर आता अंकिताचा बॉयफ्रेंड विकीन एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. विकीनं सोशल मीडिया अकाऊंटवरील कमेंट सेक्शन बंद केलं आहे. कमेंट बॉक्स बंद झाल्यामुळं आता त्याला कमेंट करत कोणी ट्रोल करणार नाही.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. यात जवळपास 30 लोकांचा समावेश आहे ज्यात त्याचे नोकर, कुटुंबीय, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र सिद्धार्थी पिटानी, सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचे डायरेक्टर मुकेश छाबडा, सुशांतचा आगामी सिनेमा दिल बेचारा मधील त्याची कोस्टार संजना संघी यांचा समावेश आहे. अलीकडेच पोलिसांनी बॉलिवूड डायरेक्टर संजय लीली भन्साळी यांचीही चौकशी केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like