Ankita Lokhande | फेऱ्यांच्या वेळी प्रचंड सुंदर दिसत होती अंकिता लोखंडे, पाहा हळद-मेहंदीपासून फेऱ्यांपर्यंत
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ankita Lokhande | अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांचा विवाह 14 डिसेंबर रोजी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला. सध्या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गोल्डन कलरच्या लेहेंग्यात नववधू बनलेली अंकिता खूपच सुंदर दिसत आहे. अकिंताचा नवरा म्हणजेच विकी जैन देखील त्याच्या लग्नाचा पोशाख परिधान करून खूप आनंदी होता. त्याने मॅचिंग व्हाईट शेरवानी घातली आहे. चला आम्ही तुम्हाला अंकिता आणि विकीच्या लग्नाचा अल्बम दाखवतो.
फोटो अंकिता आणि विकीच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमातील आहेत, जो अंकिताच्या घरी पार पडला होता. यानंतर मेहंदी व संगीताचा कार्यक्रम झाला.
अंकिता तिच्या लग्नाबद्दल नेहमीच उत्सुक होती आणि तिला मोठ्या थाटामाटात लग्न करायचे होते आणि तसे झाले. विकी जैन आणि अंकिताच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. तिच्या हळदी समारंभात अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ने लाल रंगाचा सूट परिधान केला होता.
विकी जैन आणि अंकिता यांनी त्यांच्या मेहंदी सेरेमनीला थिरकवले. या छायाचित्रात विक्की जैन अभिनेत्रीला आपल्या मांडीवर घेत आहे. फोटो पोस्ट करताना, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘आम्ही दोघांनी शेअर केलेल्या प्रेमाने आमची मेहंदी सुंदर आणि संस्मरणीय बनवली.’
लग्नापूर्वी दोघांनी प्री-वेडिंग (Pre-Wedding) व्हिडिओ शूटही केले होते.
ज्याचा व्हिडिओ अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांसह शेअर केला आहे.
एंगेजमेंटमध्ये अंकिताने ब्लॅक कलरचा ड्रेस घातला होता ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती,
तर विकीने ब्लॅक आउटफिट घातला होता. अंकिता आणि विकीने 2018 साली एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. विकी हा प्रसिद्ध उद्योगपती आहे.दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक क्षण शेअर करताना दिसत आहेत. विकीपूर्वी अंकिता सुशांत सिंग राजपूतसोबत (Sushant Singh Rajput) रिलेशनशिपमध्ये होती. विक्कीबद्दल अंकिता म्हणते, “विकीसारखा जोडीदार मिळाल्याबद्दल ती स्वतःला खूप भाग्यवान समजते. या फोटोंमध्ये अंकिता आणि विकी दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.
Web Title :- Ankita Lokhande | ankita lokhande and vicky jain wedding album haldi mehndi sangeet pictures
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Blood Sugar And High BP | ‘ब्लड शुगर’सोबतच हाय BP सुद्धा कंट्रोल करते काजू, जाणून घ्या इतर फायदे
Ranveer Singh-Deepika Padukone | रणवीरनं विमानतळावरच केलं दीपिकाला KISS, व्हिडिओ झाला व्हायरल