Coronavirus : ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रूग्ण आढळला, अभिनेत्री अंकिता लोखंडेची सोसायटी ‘सील’

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरस दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसापूर्वी मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांच्या इमारतीत कोरोनाग्रस्त व्यक्ती आढळून आली होती.त्यानंतर आता अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या सोसायटीमध्ये कोरोनाग्रस्त व्यक्ती आढळली आहे. त्यामुळे सध्या खबरदारीचा उपाय म्हणून आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी ही इमारत सील करण्यात आली आहे.

अंकिता ज्या कॉम्प्लेक्समध्ये राहते त्या कॉम्प्लेक्समधील एका व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण कॉम्प्लेक्सला सील करण्यात आले आहे. या कॉम्प्लेक्समध्ये अंकिताप्रमाणेच अशिता धवन, नताशा शर्मा, मिश्कत वर्मा यांसारखे सिलिब्रिटी राहतात. दरम्यान, माझ्याच विंगमध्ये राहणार्‍या एका व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे सध्या ही व्यक्ती क्वारंटाइनमध्ये आहे. या सार्‍या प्रकरणात मुंबई पोलीस आणि बीएमसीने केलेल्या मदतीमुळे मी त्यांचे मनापासून आभार मानते, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री अशिता धवनने दिली.

संबंधित कोरोनाची लागण झालेला व्यक्ती स्पेनवरुन भारतात परतला होता. विशेष म्हणजे भारतात आल्यानंतर विमानतळावर त्यांची कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीत त्यांचे रिपोर्टस निगेटिव्ह आले होते. परंतु 12 दिवसानंतर त्याच्यात करोनाची लक्षणे जाणवू लागली. काही दिवसापूर्वी गोरेगावमधील बिंबीसारनगरमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला होता. या परिसरात मराठी कलाविश्वातील सुबोध भावे, जयवंत वाडकर, आतिशा नाईक असे दिग्गज कलाकार राहतात.