Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Ankita Lokhande Bold Scene | गेल्यावर्षी बॉलीवूडमध्ये चांगलीच लगिनसराई चालू होती. मोठ्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी देखील लग्नगाठ बांधून, आपल्या नव्या आयुष्यासाठी सुरुवात केली. तसेच ‘पवित्र रिश्ता (Pavitra Rishta)’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) देखील डिसेंबर महिन्यात आपल्या बॉयफ्रेंड विकी जैनसोबत (Vicky Jain) लग्नबंधनात अडकली (Ankita Lokhande Breaks Silence On Doing Bold Scene). ती आता तिच्या एका अजब वक्तव्यामुळं (Ankita Lokhande Bold Scene) नेटकऱ्यांच्या चांगलीच चर्चेत आली आहे.

 

अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या चर्चेला सोशल मीडियावर उधाण आलं होतं. तसेच तिनं आपल्या लग्नसोहळ्यातील पार पडलेल्या कार्यक्रमांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तसेच हे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांमध्ये तीव्र प्रमाणात व्हायरल झाले होते. मात्र लग्नानंतर अंकिता हनिमून आणि सणवार साजरे केल्यानंतर आता पुन्हा एकदा बॅक टू वर्कसाठी तयार आहे.

अंकिता नुकतीच ‘पवित्र रिश्ता 2 (Pavitra Rishta 2)’ या शोमध्ये काम करत आहे. अलीकडेच तिची एक मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये अंकितानं आपल्या करिअरबद्दल खूप मोठं वक्तव्य (Ankita Lokhande Bold Scene) केलं. कदाचित या वक्तव्यामुळे तिच्या संपूर्ण करियरवर मोठा परिणाम होऊ शकतो. या मुलाखतीमध्ये अंकिता म्हणाली की, “मी आता बोल्ड सीन करणार नाही. तसेच मी लग्नाआधी देखील कधी उगाचच अंगप्रदर्शन करणाऱ्या भूमिका केल्या नाहीत. परंतु लग्नानंतर आता माझी जबाबदारी वाढली आहे. मी आता कोणाची तरी बायको, सून आहे. तसेच विकीला माझ्या कामाबद्दल कोणत्याही प्रकारची अडचण नाही. त्याचे विचार मॉडर्न पद्धतीचे आहेत. पण तरीसुद्धा त्याला वाईट वाटेल, दुःख होईल असं मला काही करायचं नाहीये. त्यांनं देखील लग्नानंतर काही गोष्टी माझ्यासाठी बदलल्या आहेत. स्वतःवर काही बंधने घालून घेतली आहेत. मग मी ही त्याच्यासाठी एवढं करू शकते.”

दरम्यान, या वक्तव्यानंतर अंकितानं बोल्ड सीन न करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. परंतु तिच्या (Ankita Lokhande) या निर्णयामुळे तिच्याबद्दल चाहत्यांच्या मनात चांगलाच आदर निर्माण झालाय. तसेच तिन अभिनेत्रीपेक्षा बायको या भूमिकेला अधिक प्राधान्य दिल्यामुळे, नोटकऱ्यांमध्ये तिचं कौतुक केलं जातंय.

 

Web Title : Ankita Lokhande Bold Scene | ankita-lokhande-took-this-big-decision-after-marriage-she-said-no-to

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या