अंकिता लोखंडे आणि विकी यांचा खुलेआम KISS करतानाचा Video Viral

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री अंकिता लोखंडेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. आपल्या खासगी आयुष्याबद्दल गुप्तता बाळगणाऱ्या अंकिता एक व्हिडीओ समोर आला आहे. अंकिता या व्हिडीओत चक्क तिच्या प्रियकराला किस करताना दिसत आहे. मणिकर्णिका या सिनेमातून अंकिताने डेब्यू केला आहे.

https://www.instagram.com/p/BwpzlNel7qo/

विकी जैन असं अंकिताच्या प्रियकराचं नाव आहे. दोघेही एकमेकांसोबत खूप खुश दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की अंकिताने ट्रॅ़डिशनल लुकमध्ये दिसत आहे. डान्स करताना अंकिता अचानक तिच्या प्रियकराला किस करताना दिसत आहे. अंकिताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अनेक नेटीझन्सने आणि अंकिताच्या चाहत्यांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/Bwqfh7NlE3z/

काही दिवसांपूर्वीच अंकिताने विकी जैनसोबतच्या प्रेमसंबंधांबाबत खुलासा केला आहे. अंकिता आणि विकी यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले होते. त्यानंतर अंकिताने स्वत:च आपल्या नात्याविषयी सांगितले होते. विकी जैन हा मुंबईतील एक उद्योगपती आहे. यापूर्वी अंकिता सुशांत सिंह राजपूत सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होती.