स्टनिंग अंदाजात अंकिता लोखंडेचे लेटेस्ट फोटो काही तासांतच झाले व्हायरल

पोलिसनामा ऑनलाईन – टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Actress Ankita Lokhande) अलीकडेच स्टनिंग अंदाजातील आपले लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. इन्स्टाग्राम हे फोटोशूट शेअर करताच काही तासांमध्ये ते व्हायरलदेखील झाले.

 

 

 

 

 

सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये अंकिता लोखंडे खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसते आहे. अंकिता लोखंडेने छोट्या पडद्यापासून तिच्या कारकिर्दिला सुरुवात केली. पवित्र रिश्ता या अंकिताच्या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. अंकिता लोखंडेचा जन्म १९ डिसेंबर, १९८४ला मध्यप्रदेश इंदौरमध्ये झाला होता. अंकिताने मणिकर्णिकामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.