मनोरंजनमुंबई

अभिनेत्री अंकिता लोखंडेही करणार लग्न ? विकी जैनच्या नावाची काढली मेहंदी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळं अनेकदा चर्चेत आली आहे. अंकिता तिच्या जीवनात खूप पुढे गेली आहे. लवकरच अंकिता तिचा प्रियकर विकी जैन (Vicky Jain) सोबत लग्नगाठ बांधू शकते. अंकितानं तिच्या स्टोरीला शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओ वरून तर तसंच काहीसं वाटत आहे. तिनं गुपचूप मेहंदी काढली आहे. खास बात अशी की, ही मेहंदी तिचा होणारा नवरा विकी जैनच्या नावाची आहे.

फोटो आणि व्हिडीओत अंकिता खूप खुश दिसत हे. तिच्या हातावर मेहंदी दिसत आहे. कुणतीरी तिला हग करतानाही दिसत आहे.

फोटोत अंकिता तिच्या हातवरील मेहंदी दाखवत आहे आणि पोज देत आहे. मेहंदीही खूप सुंदर आहे. तिचा आनंद जणू गगनात मावेनासा झाला आहे असंच काहीसं चित्र आहे.

दीर्घकाळापासून विकी जैनला करतेय डेट
विकी जैन हा मुंबईतील एक उद्योगपती आहे. दोघं दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशलवर अनेकदा समोर आले आहेत ज्यात त्यांचा रोमँटीक अंदाजही दिसला आहे. कधी कधी तर ते मस्ती करतानाही दिसले आहेत.

अंकिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पवित्र रिश्ता या मालिकेव्यतिरीक्त तिनं सिनेमातही काम केलं आहे. कंगना रणौतच्या मणिकर्णिका या सिनेमात तिनं महत्त्वाची भूमिका साकारली आहे. टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमातही तिनं काम केलं आहे.

Back to top button