सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी कळताच अंकिता लोखंडेनं उच्चारला फक्त एकच ‘शब्द’ ! म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. ही घटना समोर आल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे हिलाही धक्का बसला. जेव्हा एका वृत्तवाहिनीनं तिच्या प्रतिक्रियेसाठी कॉल केला आणि सुशांतबद्दल सांगितलं तेव्हा अंकितानं एकच शब्द उच्चारला आणि तिनं फोन ठेवून दिला.

जेव्हा एका वृत्तवाहिनीनं अंकिता लोखंडेला कॉल केला आणि सुशांतच्या आत्महत्येचं सांगितलं तेव्हा अंकितानं एकच शब्द काढला. अंकिता एवढंच म्हणाली, “काय.” यानंतर ती काहीही बोलली नाही आणि तिनं फोन ठेवून दिला. काय हा एकच शब्द तिनं उच्चारला होता. हे ऐकून ती शॉक झाली होती.

पवित्र रिश्ता या मालिकेत सुशांत अंकिता यांची जोडी खूप फेमस होती. दोघं काही काळ रिलेशनशिपध्येही होते. नंतर मात्र दोघे वेगळे झाले होते.