…म्हणून मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नव्हते, अंकिता लोखंडेनं पहिल्यांदाच सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येला दीड महिन्याचा कालावधी होऊन गेला आहे. या दीड महिन्यात सुशांतची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच ती सुंशांतच्या अंत्यविधीला देखील उपस्थित राहिली नाही. आता अंकिताने आपले मौन सोडले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने सुशांतबद्दल कदाचीत पहिल्यांदाच इतकी बोलली. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता कोलमडली होती. मात्र, सुशांतच्या अंत्यविधीला अंकिता हजर राहिली नाही. यावर ती ट्रोलही झाली होती. आता तिने सुशांतच्या अंत्यविधीला हजर न राहण्याचे कारण सांगितले आहे.
मी सुशांतला कधीच त्या अवस्थेत पाहू शकले नसते. मी त्याला त्या अवस्थेत पाहिले असते तर मी कधीच विसरू शकले नसते. त्यामुळे मी त्याच्या अंत्यविधीला न जाण्याचे ठरवले, असे अंकिताने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

अंकिता म्हणाली, त्या दिवशी मी झोपले होते. अचानक मला एका पत्रकाराचा फोन आला. त्या पत्रकारानेच मला पहिल्यांदा सुशांतच्या आत्महत्येची बातमी दिली. ती बातमी ऐकताच मला धक्का बसला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. सुशांत असे काही करेल, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. काय बोलू, काय करु, काहीच सुचत नव्हते. मी नुसती रडत होते. त्याच्या अंत्यविधीला मी जाऊच शकणार नव्हते. सुशांतला त्या अवस्थेत बघणे माझ्यासाठी शक्य नव्हे. यामुळे मी अंत्यविधीला जाणे टाळले. पण त्याच्या कुटुंबाला मी भेटण्यासाठी गेले. त्यांना भेटणे, त्यांच सांत्वन करणे माझे कर्तव्य होते.

सुशांत डिप्रेशनमध्ये असूच शकत नाही
सुशांत डिप्रेशनमध्ये जाणे शक्यच नाही. तो डिप्रेशनमध्ये होता, असे म्हणणारे त्याला कीती ओळखतात ? मी त्याला ओळखत होते. तो नैराश्यात जाणारा मुलगा नव्हताच. मी हे दाव्यानिशी सांगू शकते, असेही तिने सांगितले.

तर त्याने कधीच आत्महत्या केली असती
सुशांत आत्महत्या करूच शकत नाही. असे असते तर त्याने कधीच आत्महत्या केली असती. पवित्र रिश्ता ही मालिका सोडल्यानंतर तो तीन वर्षे घरी बसून होता. त्याच्याजवळ काहीच काम नव्हते. बॉलिवूडमध्ये तो स्ट्रगल करत होता. मी कामावर जायचे आणि तो एकटा घरी असायचा. नैराश्य आणि काम मिळत नसल्यामुळे आत्महत्या करायची असती तर त्याने तेव्हाच केली असती, असेही अंकिताने सांगितले.