Video : बॉयफ्रेंडवर ऑन कॅमेरा ओरडली अंकिता लोखंडे, म्हणाली ‘सोशल मीडियावर असं बोलू नकोस !’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आपल्या लुक आणि फोटोंमुळं कायमच चर्चेत येत असते. यावेळी अंकिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे तिनं शेअर केलेला व्हिडिओ आहे. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

अंकितानं तिच्या इंस्टावरून काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यात ती तिचे मित्र-मैत्रीण आणि बॉयफ्रेंड विकी जैन (Vicky Jain) सोबत दिसत आहे. यात अंकिता या सर्वांसह दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. दिवाळी पार्टीत सर्वांना हसत खेळत शुभेच्छा देत असतानाच तिच्या मागे असलेल्या विकीनं मात्र एका शब्दाचा वापर केला. यानंतर अंकिता त्याला ओरडते आणि सांगते की, सोशल मीडियावर असं बोलायचं नसतं. यानंतर पुन्हा एकदा अंकिता आणि विकी मिळून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

अंकितानं तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात विकी सोबतच्या रोमँटीक फोटोंचाही समावेश आहे. चाहत्यांना अंकिताचा लुक विशेष आवडला आहे.

अंकिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पवित्र रिश्ता या मालिकेव्यतिरिक्त तिनं सिनेमातही काम केलं आहे. कंगना रणौतच्या मणिकर्णिका या सिनेमात तिनं महत्त्वाची भूमिका साकारली आहे. टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमातही तिनं काम केलं आहे.