अंकिता झाली पून्हा ‘भावूक’ ! आठवण काढत केला ‘त्या’ व्यक्तीचा फोटो शेअर, सुशांतसह खास ‘कनेक्शन’

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येनंतर त्याच्या मागची कारण शोधली जात आहे. सुशांतच्या वडिलांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. त्यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागले असून, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे सुशांतच्या आत्महत्येचं खरं कारण समोर येण्यासाठी पुढे आली आहे. दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर अंकिताने केवळ सुशांतसाठी पोस्ट शेअर केल्या आहेत. म्हणून तिच्या या पोस्ट चर्चेचा विषय बनला आहे.

अंकिताने इंस्टाग्रामवर अलीकडेच एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने सुशांतच्या आईचा फोटो शेअर केला आहे. अंकिताच्या हातात सुशांतच्या आईची फोटोफ्रेम आहे. त्या फोटोला “आशा करते की, तुम्ही दोघे एकत्र असाल” असे कॅप्शन अंकिताने दिलं आहे.

View this post on Instagram

Believe you both are together ❤️ #warriors4ssr

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

सुशांतची आई उषा सिंग यांचे २००२ साली निधन झाले आहे. सुशांत त्याच्या आईबद्दल सतत बोलताना दिसायचा. सुशांतचे त्याच्या आईवर जीवापाड प्रेम होते. आईच्या आठवणीत व्याकुळ झालेल्या सुशांतने बऱ्याचवेळा आईचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर सुशांतची शेवटची पोस्ट सुद्धा आईवरच आहे.

एका पोस्टमध्ये सुशांतच्या चाहत्याने त्याला त्याच्या नावाचा अर्थ विचारला होता. तेव्हा उत्तर देताना सुशांतने सांगितले “याचा अर्थ काहीही ते सर्वकाही असा होतो. पण चांगली गोष्ट म्हणजे माझ्या नावाच्या मध्यभागी म्हणजे हृदयात माझ्या आईचे म्हणजे ‘उषा’ (s’USHA’nt) आहे. काय अद्भुत गोष्ट आहे ना?” असे सुशांतने म्हटले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like