अभिनेत्री अंकिता लोखंडेची बॉयफ्रेंड विकी जैनसोबत खास दिवाळी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री अंकिता लोखंडेने यंदा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत उत्साहात दिवाळी सेलिब्रेशन करत (ankita-lokhande-special-diwali-celebration-with-boyfriend-vicky-jain) आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अंकिताने इन्स्टाग्रामवर या सेलिब्रेशनचे बरेच फोटो पोस्ट केले आहेत. लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये अंकिताचं सौंदर्य खुलून दिसत आहे.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अंकिता लोखंडे घराघरात पोहोचली. मालिकेदरम्यान तिच्या आणि सुशांत सिंह राजपूतच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगल्या होत्या. अंकिता सुशांतसोबत सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. सुशांतसोबत ब्रेकअपच्या काही काळानंतर अंकिताच्या आयुष्यात विकी जैन आला.

विविध कार्यक्रमांमध्ये या दोघांना एकत्र पाहिले गेले असून काही दिवसांपूर्वीच विकीने अंकितान प्रपोज केले आहे. प्रपोज करतानाचे फोटोसुद्धा अंकिताने सोशल मीडियावर शेअर केले होते. विकी जैन मुंबईतील एक व्यावसायिक आणि बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा सहमालक आहे. अंकिताने ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने झलकारी बाईची व्यक्तिरेखा साकारली होती. यात तिच्या वाट्याला आलेली लहानशीच भूमिका तिने उत्तमरित्या साकारली होती. बागी 3 मध्ये अंकिताने टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरसोबत काम केले आहे. या चित्रपटात तिने रितेश देशमुखच्या पत्नीची भूमिका साकारली होती.