शेखर सुमनच्या शोमध्ये बोलताना अंकिता म्हणाली होती – ‘कोरियोग्राफरला सुशांतच्या मिठीत पाहून जलसी वाटायची’ ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आता एक महिना झाला आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे ही सतत चर्चेत येत आहे. दीर्घकाळ दोघं नात्यात होते. नुकताच अंकिताचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होत आहे. यात अंकिता सुशांतसोबत लग्न करण्यावरही भाष्य करत आहे आणि इतरही खूप काही बोलली आहे. हा व्हिडीओ जुना आहे असून अभिनेता शेखर सुमनचा टॉक शो मूवर्स अँड शेखर या शोमधील आहे.

‘मी कायचम सुशांतवर राग काढते’

शेखरनं अंकिताला विचारला की, जेव्हा तू एका पॉप्युलर डान्स शोमधून बाहेर पडली होती तेव्हा तू तुझा राग कोणावर काढला होता. यावर अंकितानं ताडकन उत्तर दिलं की, ती कायमच तिचा राग सुशांतवर काढत असते.

‘कोरियोग्राफरला सुशांतच्या मिठीत पाहून जलसी वाटायची’

पुढे बोलताना अंकिता म्हणाली, “जेव्हा सुशांतला याच डान्स शोमध्ये जेव्हा 30 पॉईंट्स मिळाले होते तेव्हा मी हैराण झाले होते. मी त्याला म्हटलं होतं की, तू पूर्ण 30 पॉईंट कसे मिळवू शकतोस. इतकंच नाही तर जेव्हा सुशांतची कोरियोग्राफर डान्स करताना जेव्हा त्याच्या मिठीत असायची तेव्हा मला जलसी वाटायची.”

कधी करणार लग्न ? अंकिता म्हणाली…

यावेळी बोलताना अंकितानं असंही सांगितलं की, ती सुशांतपेक्षा जास्त चांगली डान्सर आहे. इतकंच नाही तर लग्नाचा प्रश्न विचारल्यानंतर ती म्हणाली होती की, ती आणि सुशांत पुढील वर्षी लग्न कराणार आहोत. हमारा पवित्र रिश्ता बहुत स्ट्राँग है असं उत्तर तिनं दिलं होतं. तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मीही त्याच्यावर खूप प्रेम करते असं अंकितानं सांगितलं होतं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like