अण्णा बनसोडेंच्या प्रचारार्थ शहरात भव्य रॅली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी शहरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली.
anna bansode
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर ज्येष्ठ नगरसेविका मंगलाताई कदम, माजी महापौर ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, माजी उपमहापौर नगरसेवक राजू मिसाळ, डब्बू आसवानी, नगरसेवक जावेद शेख, रोहित काटे, निकिता कदम, स्थायी समितीचे माजी अध्यक्षा उषा वाघेरे, जगदीश शेट्टी, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, दत्तोबा लांडगे, एकनाथ मोटे, किरण मोटे, निलेश पांढारकर, उत्तम हिरवे, माजी नगरसेविका सुरेखा लांडगे, राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश युवक सरचिटणीस विशाल काळभोर, श्रीमंत जगताप, मीरा कुदळे आणि प्रचंड संख्येने कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. भक्ती शक्ती चौकातून सुरु झालेल्या या रॅलीचा समारोप दापोडी येथे करण्यात आला.
anna bansode
भक्ती शक्ती चौकातील भक्ती शक्ती समूह शिल्पाला आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरुवात झाली. काचघर, भेळचौक, एलआयजी कॉलनी, आकुर्डी रेल्वे स्टेशन, संभाजी चौक, आकुर्डी गावठाण, विठ्ठलवाडी, दत्तवाडी, मधुकर पवळे उड्डाणपूल, खंडोबामाळ, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, मोहननगर, फुलेनगर, दत्तनगर, रामनगर, परशुराम चौक, विद्यानगर, बर्ड व्हॅली चौक, थरमॅक्स चौक, केएसबी चौक, मोरवाडी कोर्ट, लालटोपीनगर, एसएनबीपी स्कूल, अजमेरा, कामगारनगर, खराळवाडी, एचए ग्राऊंड, आंबेडकर चौक, शगुन चौक, साई चौक, अशोक टॉकीज, डिलक्स थिएटर, भाटनगर, आंबेडकर चौक, एच.ए. कंपनी, महेशनगर, संततुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, कासारवाडी रेल्वेगेट परिसर, फुगेवाडी दापोडी नवीन उड्डाणपूलावरून नगरसेवक रोहित अप्पा काटे यांच्या कार्यालयासमोर या रॅलीचा समारोप झाला.
anna bansode
शनिवारी पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी दापोडी गावठाण, फुगेवाडी गावठाण, कासारवाडी, पिंपरी गावठाण, पिंपरी कॅम्प, संभाजीनगर, मोहननगर, शाहूनगर, आकुर्डी गावठाण, आकुर्डी, निगडी, प्राधिकरण, या परिसरात नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन प्रचारपत्रक वाटप करीत बहूमताने निवडूण देण्याचे आवाहन केले.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या