अण्णा- गिरीश महाजन यांच्यात बंद खोलीत चर्चा 

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – अण्णांची प्रकृती खालावत चालल्याने सरकारला जाग आली असून, आज दुपारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे राळेगणसिद्धीत दाखल झाले आहेत. त्यांची आत्ता अण्णांसोबत बंद खोलीत चर्चा सुरू आहे.

राळेगणसिद्धी येथे आल्यानंतर गिरीश महाजन म्हणाले की, अण्णांच्या प्रकृतीची आम्हालाही काळजी आहे. त्यांनी जास्त दिवस उपोषण करणे प्रकृती स्वास्थ्याला धरून राहणार नाही. म्हणून राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी राळेगणसिद्धीत आलो आहे. जवळपास बहुसंख्य मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्यामुळे तोडगा निघेल, अशी आशा आहे.

माध्यमांची बोलल्यानंतर गिरीश महाजन व अण्णा हजारे यांच्यात बंद खोलीत चर्चा सुरू झाली आहे. सुमारे अर्ध्या तासापासून ही चर्चा सुरू आहे. बहुसंख्य मागण्या मान्य झालेल्या असल्या तरी कुठल्यातरी एका मुद्द्यावर राज्य सरकार व अण्णांमध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे चर्चा सुरूच आहे. या चर्चेतून नेमका निष्कर्ष निघतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

अण्णांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे चार दिवस सरकारचा कोणीही प्रतिनिधी राळेगणसिद्धीकडे फिरकला नाही मात्र अण्णांची प्रकृती खालावत आल्यानंतर व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सरकारला जाग आली आहे राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी नगर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like