…तर पोलिसांनी केलेले एन्काऊंटरच योग्य : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – देशात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहे. त्यांचे खटले ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवूनही आरोपींना लवकर फाशी होत नसेल, तर पोलिसांनी केलेले एन्काउंटरच योग्य आहे, मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.

हैदराबाद येथील एका डॉक्टर महिलेवरील बलात्कार, खून प्रकरणातील चार आरोपींचे एन्काऊंटर झाले. त्याबाबत बोलताना हजारे म्हणाले की, सामाजिक कार्यकर्ते, वकील, नेते मंडळी या चकमकीला गुन्हा समजत असतील. मात्र, अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना लवकर फाशी होत नसेल तर एन्काउंटर योग्यच आहे. दिल्लीतही पूर्वी अशीच अत्याचाराची घटना घडली होती. त्यातील आरोपींनाही अद्याप फाशी झालेली नाही.

आपल्या देशाची घटना सर्वोत्तम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वंकश विचार करून घटना तयार केली आहे. मात्र, या घटनेच्या चौकटीत राहून लवकर न्याय मि‌ळत नसेल तर अशा पोलिस चकमकीला योग्यच म्हणावे लागेल, असे हजारे म्हणाले.

Visit : Policenama.com