Anna Hazare | अशा सरकारच्या राज्यात जगण्याची इच्छा नाही, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे हताश उद्गार

राळेगणसिद्धी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारच्या (State Government) सुपरमार्केटमध्ये (Supermarket) वाइन विक्रीच्या (Wine Sell) निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक (Senior Social Worker) अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी 14 फेब्रुवारीपासून प्राणांतिक उपोषण करण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्राची संस्कृती (Maharashtra Culture) जपण्यासाठी किर्तनकार किर्तन करतात. पण सरकार किराणा दुकानात (Grocery Store) वाइन ठेवून ते क्षणात धुळीस मिळवत आहे. हे सर्व बघून आता अशा सरकारच्या राज्यात जगण्याची इच्छा नाही, असे हताश उद्गार अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी काढले आहेत. तसेच उद्यापासून होणारे अमरण उपोषण (Fasting) पुढे ढकलले असल्याची घोषणा केली आहे.

 

अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) प्रधान सचिव वल्सा नायर सिंह (Principal Secretary Valsa Nair Singh) यांनी अण्णांची राळेगणसिद्धी (Raleganasiddhi) येथे भेट घेऊन त्यांच्यासोबत तीन तास चर्चा केली. तसेच वाइन विक्रीच्या निर्णयाबाबत राज्यातून हरकती मागवल्या जातील त्या हरकतींचा सूर लक्षात घेऊन निर्णयाची अंमलबजावणी करायची की नाही तो निर्णय घेतला जाईल, असे नायर यांनी अण्णांना सांगितले.

 

वाइन विक्री निर्णयाविरोधात अण्णा हजारे 14 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार होते. परंतु अण्णांनी उपोषण करु नये असा ग्रामसभेत (Gram Sabha) ठराव करण्यात आला. वयाचा विचार करुन अण्णांनी उपोषण करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली. अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला आहे. त्यामुळे अण्णा आंदोलन करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

याबाबत बोलताना अण्णा म्हणाले होते, मी सरकारच्या निर्णयाबाबत 50 टक्के समाधानी असून उपोषणाबाबत ग्रामसभेत निर्णय घेतला जाईल. त्यानुसार आज राळेगणसिद्धी येथे विषेश ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अण्णांनी आपल्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करुन उपोषण करु नये असा ठराव ग्रामसभेसमोर ठेवण्यात आला. याबाबत बोलताना अण्णा हजारे म्हणाले, सरकारने घेतलेला निर्णय अतिशय दुर्दैवी असून अशा सरकारच्या राज्यात मला जगण्याची इच्छा राहिलेली नाही. असे निर्णय घेताना सरकारने जनतेच्या भूमिका जाणून घेणे गरजेचे असून तसं न झाल्यास याला लोकशाही (Democracy) कसं म्हणता येईल, असे निर्णय घेणे म्हणजे एक प्रकारची हुकूमशाहीच असल्याचे त्यांनी म्हटले.

सरकारने आपल्याला तीन महिन्यात हरकती मागवून जनतेचा सूर लक्षात घेऊन वाईन विक्रीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
सरकारने जर घुमजाव केला तर माझा उपोषणाचा मार्ग मोकळा आहे.
मी आणखी तीव्र आंदोलन (Agitation) करेल, राज्यभर फिरून कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेईल, असेही त्यांनी म्हटलं.
तसेच 2021 पासून या निर्णयाबाबत सरकार प्रयत्नशील होते.
यामध्ये नेमका फायदा कोणाचा आहे याची नावे मी लवकरच जाहीर करणार आहे, असेही अण्णा हजारे यांनी सांगितले.

 

Web Title :- Anna Hajare | Senior Social Worker anna hajare slam maharashtra goverment on wine sell

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा