Anna Hazare | लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Anna Hazare | लोकायुक्त कायदा (Lokayukta Act) करू असे आश्वासन देऊन अडीच वर्षे उलटली तरी मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाही. यामागे नक्कीच काही तरी घडले आहे,’ असा आरोप करत लोकायुक्त कायद्यासाठी पुन्हा मैदानात उतरण्याची घोषणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी केली आहे.

 

राळेगणसिद्धी (Raleganasiddhi) येथे नुकतेच भ्रष्टाचार जन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांचे शिबिर झाले. त्याच शिबिरात अण्णांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी लोकायुक्त कायद्यासाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. (Anna Hazare)

 

अण्णा हजारे म्हणाले की, ”तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लोकायुक्त कायदा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही आश्वासन दिले होते. मात्र अडीच वर्षे झाली तरी त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. मुख्यमंत्री ठाकरे त्यावर बोलायला तयार नाहीत. या कायद्याबाबत नेमके काय झालं आहे हे कळायला मार्ग नाही. काय घडलंय ? कोणी काही जादू केली का ? ठाकरे बोलायचे का बंद झाले ? या संदर्भात मला काहीच माहिती नसल्याचे,” अण्णा हजारे म्हणाले.

 

Web Title :- Anna Hazare | anna hazare said chief minister is not saying anything will fight for lokayukta law

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा