‘नावे ठेवणारेच आता अण्णांना पाठींबा देत आहेत’ : मुख्यमंत्री

लोणंद : पोलीसनामा ऑनलाईन – आम्ही अण्णांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत असे म्हणत त्यांनी हे उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मागील काळात ज्यांनी अण्णांना नावे ठेवली असेच लोक आज आम्ही आण्णांच्या पाठीमागे आहोत असे सांगून उपोषनणास पाठींबा देत आहेत. ते अण्णांनी समजून घ्यावे. विरोधक याचे राजकारण करत आहेत. विरोधकांची तुमच्या बद्दल पूर्वी काय मते होती ती सर्व लोकांनी ऐकलेली आहेत. असे मुख्यमंत्री म्हणाले. उगीच खोट्या गोष्टी सांगून विरोधकांनी दिशाभूल करू नये असा खोचक टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

खंडाळा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत असताना त्यांनी सदर माहिती दिली आहे. तसेच अण्णांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचेही सांगितले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अण्णा हजारे यांना हे उपोषण न करण्यासाठी आम्ही विनंती केली आहे. त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. लोकायुक्त बाबत त्यांनी सांगितलेली संयुक्त समिती बनवण्याबाबत सरकारने होकार दिला आहे. तर केंद्र शासनाशी संबंधित असणाऱ्या विषयावर त्यांना योग्य ती पत्रे दिली आहेत.” याशिवाय त्या सर्व विषयावर केंद्र सरकारने कारवाई केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. इतकेच नाही तर, ‘त्या संदर्भातील पत्र पंतप्रधान कार्यालया कडून त्यांना गेले आहे. म्हणून आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी हे उपोषण मागे घ्यावे. तसे विनंती करणारे पत्रही मी पाठवले आहे’ असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Loading...
You might also like