Anna Hazare | अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा; पुन्हा बसणार उपोषणाला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी राज्यातील ठाकरे सरकारला (Thackeray government) आंदोलनाचा इशारा दिला आहे. हे सरकार फक्त पडण्यासाठी घाबरत आहे, त्यामुळे हे सरकार मोर्चे आंदोलनाला घाबरत नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी लोकायुक्त कायदा (Lokayukta Act) लागू करावा. अशी मागणी अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्याकडून करण्यात येत आहे.

अण्णा हजारे (Anna Hazare) म्हणाले की, जनतेकडे सर्वाधिकार मिळाल्याने भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर लोकपाल व लोकायुक्त कायदा (lokpal and lokayukta act 2013) खूप प्रभावी व सक्षम असा कायदा आहे. जनतेने जर मुख्यमंत्री, आमदार, अधिकारी यांच्याविरोधात सक्षम लोकायुक्ताकडे पुरावे दिले तर त्यांची चौकशी करून कारवाई करतील इतका प्रभावी व सक्षम असा हा कायदा आहे. मात्र, राज्य सरकार त्याकडे चालढकल करत असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.

पुढे बोलताना अण्णा हजारे (Anna Hazare) म्हणाले, करेंगे या मरेंगे असं म्हणत आम्ही 2011 मध्ये आंदोलन केलं होतं.
केंद्रामध्ये लोकपालला सरकार घाबरलं होतं, जेव्हा देशभरात आंदोलन झाल्यानंतर मान्य केलं.
तर, आतापासून आम्ही कार्यकर्त्यांना कळवत आहोत, प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांना सांगत आहोत, आंदोलनाच्या तयारी लागा.
हे सरकारचं बघू (महाविकास आघाडी सरकार), आता सप्टेंबर आहे, आम्ही एक नोटीस देणार आहोत,
त्यानंतर एकाच वेळेला राज्यभरात मोठं आंदोलन करणार आहोत,
अंहिसेच्या मार्गाने हे आंदोलन करणार आहोत, असं देखील अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आम्ही 2011 पासून आंदोलन करत आलो आहे.
भाजपच्या काळात सुद्धा आंदोलन करण्यात आले आहे.
या सरकारला लोकपाल व लोकायुक्त कायदा आणण्यासाठी मागणी केली होती.
त्यामुळे या सरकारला 3 महिन्याचा कालावधी देत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात वयाच्या 85 व्या वर्षी सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी राज्य सरकार विरोधात उपोषण करण्याचा इशारा अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी दिला आहे.

Web Titel :- anna hazare will go on hunger strike again warned to thackeray government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | काय सांगता ! होय, पुणे मनपाचा कर्मचारी निघाला अट्टल मोबईल चोर, 2 लांखांचा मुद्देमाल जप्त

Bhausaheb Rangari Ganpati | प्रसिध्द उद्योगपती पुनीत बालन यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती उत्सवाच्या सांस्कृतीक कार्यक्रमांची केली घोषणा, यंदाही ऑनलाईन कार्यक्रम पाहता येणार

Railway Recruitment 2021 | रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ! विविध पदांसाठी होणार भरती, परीक्षेविना थेट नियुक्ती