अण्णाभाऊ साठे जयंतीमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : साने 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीमध्ये सत्कार करताना अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कांदबरी देणे अपेक्षित असताना मदर तेरेसाचे पुस्तक वाटून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम सुरु असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. तसेच जयंती उत्सवात भाजपाच्या पदाधिका-याचा नाव व फोटो वापरुन महापालिकेचा लोगो विनापरवाना वापरला आहे संबंधित स्मृतिचिन्ह करणा-या संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राव्दारे केली.

[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17819648-96dc-11e8-a973-b5342030b5e7′]

पिंपरी चिंचवड महानगगरपालिकेच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव साजरा केला जात आहे. या कार्यक्रमात प्रशासन अधिका-यामध्ये समन्वय नाही. त्यामुळे जयंती उत्सवात सावळा गोंधळ सुरु आहे. महापालिकेने कलाकारांचा सत्कार करण्यसाठी पुस्तके दिली जातात. या कार्यक्रमात फकीरा कांदबरी देण्याऐवजी मदर तेरेसा यांचे पुस्तक देऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुर आहे. तर महापालिकेच्या या उत्सवात भाजपाचे एक पदाधिकारी यांनी महापालिकेचे बोधचिन्ह विनापरवानगी वापरुन आपला फोटो व नाव छापण्याचा पराक्रम केला आहे. खाजगी स्मृतीचिन्हावर विनापरवानगी महापालिकेचे बोधचिन्ह वापरता येते का संबधित प्रकरणाची सखोल चौकशी करुन स्मृति चिन्हावर मनपाचे बोधचिन्ह विनापरवागी वापरणा-या संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.

अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवात कार्यक्रमाच्या ठिकाणी येणा-या पाहुणे, कलाकार यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, चालयाची सुविधा नाही. नियोजित कार्यक्रमांची पूर्वसुचना वक्त्यांना व कार्यकर्त्यांना देण्यात येत नाही. तसेच या कार्यक्रमात कला सादर करणा-या कलाकाराचे मानधनही अपुरे दिलेले आहे. कलाकारांना ठरल्याप्रमाणे मानधन दिले जात नाही. अश्या स्वरुपाच्या लेखी तक्रारी अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे प्रमूख पदाधिकारी अरुण जोगदंड, अनिल सौंदडे, नितीन घोलप, भाऊसाहेब अडागळे, दिपान झोंबाडे, मनोज तोरडमल, हनुमंत कसबे, गणेश क्षिरसागर, शिवाजी साळवे, बाळासाहेब रसाळ, भिमा वाघमारे, भारती चांदणे व अनिता कांबळे इ. पदाधिका-यांनी केल्या असल्याचे दत्ता साने यांनी सांगितले.