अण्णांची प्रकृती खालावली : ग्रामस्थ झाले आक्रमक

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून, त्यांची प्रकृतीखालावत चालली आहे. त्यामुळे राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांच्या यकृतावर परिणाम झाला आहे. रक्तदाबाचाही त्रास होऊ लागला आहे. उपोषण सुरुच राहिले, तर किडनी आणि मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

दरम्यान, सरकारकडून अण्णांच्या उपोषणाची दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. पारनेर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. अण्णांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झाले आहेत. तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. दुसरीकडे अण्णांच्या उपोषणाचा हा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या यकृतावर परिणाम झाला असून, रक्तदाबाचाही त्रास होत आहे.

‘ती अण्णांची आत्महत्या असेल’
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा प्रकृती खालावत चालली आहे. त्यांच्या वयाच्या मानाने त्यांनी जास्त दिवस उपोषण करणे, ही आत्महत्या ठरेल, असे मत त्यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटले आहे.