अण्णासाहेब मगर शाळेची पाहणी 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

महापालिकेतर्फे विध्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच अन्य सुविधाही पुरवल्या जात असतात. त्याचा लाभ पूर्णपणे विध्यार्थ्यांना होतो किंवा नाही, याची पाहणी  पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर शाळेत जाऊन महापौर जाधव व नगरसेवक नाना काटे यांच्याकडून करण्यात आली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’84dc73be-c56c-11e8-9b1f-cf894d441ea8′]

यावेळी महापौर जाधव व नगरसेवक नाना काटे यांनी विध्यार्थ्यंशी सवांद साधला. त्यांनी विध्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले त्याचे अचूक उत्तरे यावेळी विध्यार्थ्यांनी दिली. याप्रसंगी नुकत्याच शाळेचा लागलेल्या २०१८ या वर्षीचा इयत्ता १० वी चा निकाल हा कौतुकास्पद आहे, यावेळी या यशाबद्दल शिक्षकांचे अभिनंदन महापौर जाधव व नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी वर्ग खोल्यांची, मैदानाची, पाहणी करण्यात आली, शाळेची पटसंख्या खूप चांगली आहे.पटसंख्या पाहता या शाळेला लागण्यार्या सोयी सुविधा वेळेवर देण्यात याव्या अश्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकार्ण्या देण्यात आल्या. महापौर राहुल जाधव यांचे शाळेच्या वतीने नगरसेवक नाना काटे यांनी स्वागत केले.यावेळी शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे, शिक्षण समितीचे अधिकारी, शाळेतील शिक्षक वर्ग उपस्तीत होते.

खुर्शीपार येथे पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन


जाहीरात