#Anniversary : मित्राची सेटींग लावण्यासाठी सोनम कपूरसोबत बोलायला गेला आनंद आहुजा, स्वत:च पडला ‘प्रेमात’ ! ‘अशी’ आहे दोघांची मजेदार ‘Love Story’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार सोनम कपूर आणि तिचा पती आनंग आहुजा लग्नाचा दुसरा वाढदिवस आज (शुक्रवार दि 8 मे) साजरा करत आहे. या निमित्तानं सोनमनं खास फोटो शेअर करत त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनम आणि आनंदच्या लव स्टोरी बद्दल बोलायचं झालं तर ती खूप मजेदार आहे.

खंर तर आनंदच्या मित्राला सोनम आवडत असे. त्याच्यासाठीच आनंद सोनमशी बोलत होता. पंरतु त्याला माहिती नव्हतं की, तोच तिला आपलं हृदय देऊन बसेल. 2015 साली सोनम कपूर तिचा सिनेमा प्रेम रतन धन पायो प्रमोट करत होती. याच काळात आनंद आणि सोनम यांची भेट झाली होती.

सोनमच्या त्यांच्या पहिल्या भेट्टीबद्दल सांगितलं की, “मी आनंद आणि त्याच्या मित्राला पाहिलं होतं. त्याचा मित्र माझ्या सारखा उंच होता. त्याला वाचनाची आवड होती. तो हिंदी सिनेमाचा फॅनही होता. लोक म्हणतात की, ज्यांच्या आवडी निवडी मिळत नाहीत ते सोबत राहू शकत नाहीत. कधीच कोणी विचार केला नव्हता की, मी आणि आनंद एकत्र राहू शकू. आम्ही एकमेकांपेक्षा वेगळो आहोत.”

सोनमनं सांगितलं की, “मी जेव्हा आनंदला भेटले तेव्हा त्याला हे माहिती नव्हतं की, माझे वडिल अनिल कपूर आहेत. आनंद माझं आणि मित्राचं बोलणं करून द्यायचं होतं. परंतु शेवटी मात्र मित्र राहिला बाजूला आणि आम्हीच बोलत राहिलो.”