राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक तारीख जाहीर 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक तारीख जाहीर करण्यात आली आहे. सभापती एम. वेंकैया नायडू यांनी आज (सोमवार) राज्यसभेत ही घोषणा केली. या निवडणुकीसाठी 8 ऑगस्ट दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’024c689e-9977-11e8-81de-4b8abafdbf79′]

9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता कागदपत्र सभागृहापुढे ठेवल्यानंतर उपसभापतीपदाची निवड केली जाईल. उपसभापती पी.जे कुरियन यांचा कार्यकाळ मागील महिन्यात संपला आहे.

पक्षीय उमेदवार अनिश्चित –
निवडणुकीत कुठल्याही पक्षाने आपला उमेदवार आणखी  निश्चित केलेला नाही. भाजप पक्षाचे राज्यसभा नेते प्रसन्ना आचार्य यांना उपसभापती पदासाठी मैदानात उतरवू शकते. राज्यसभेत 245 सदस्य असल्याने , उपसभापतीची निवडणूक जिंकण्यासाठी 122 जणांचा पाठिंबा लागणार आहे. काँग्रेस त्यांचा उमेदवार उभा करण्यासाठी भाजपविरोधी पक्षाचे सहकार्य घेऊ शकते.