home page top 1

राज्यातील ५ पोलिसांना विशेष सेवेसाठी तर ४१ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक

ACP राम जाधव यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती पदक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सालाबादाप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील तब्बल ४६ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके जाहिर करण्यात आली आहेत. ५ जणांना विशेष सेवेसाठी तर ४१ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापूर पोलिस दलातील करवीर उपविभागातील उपविभागीय अधिकारी राजाराम पाटील, मुंबईच्या साकीनाका विभागातील सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद भिकाजी खेटले, पुण्यातील एसआरपीएफमधील असिस्टंट कमांडंट हरिश्चंद्र काळे आणि कोल्हापूर पोलिस दलातील विशेष शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) मारूती कलप्पा सूर्यवंशी यांना (विशेष सेवा) राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे.

एन्काऊंटर फेम अशी ओळख असणाऱ्या सहाय्यक पोलिस आयुक्त रामचंद्र जाधव यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळाले आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि ठाणे तसेच राज्य दहशतवाद विरोधी पथक येथे कार्यरत असताना राम जाधव यांची अनेकवेळा सराईत गुन्हेगारांशी चकमक झाली होती. चकमकीत जाधव यांनी अनेक गुंड आणि गँगस्टरला कंठस्नान घातले आहे. काही वेळा जाधव देखील चकमकीत जखमी झाले होते. तिसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळवणारे ते बहुदा पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पहिलेच अधिकारी आहेत. राजाराम पाटील यांना देखील दुसऱ्यांना राष्ट्रपती पदक मिळाले आहे. दरम्यान, महाराष्ट्राला नागरी सेवा, होमगार्ड आणि अग्निशमन विभागात एकही पदक मिळाले नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like