34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांची आरक्षणाची सोडत जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातल्या सर्व 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, विमुक्त जाती, ग्रामविकास विभागाचे उपसचिव आर ए नागरगोजे, विधी व न्याय विभागाचे सहसचिव द. सं. पाटील, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, चंद्रपूर जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग कल्याण विभागचे उपसचिव रविंद्र गुरव, ठाणे जि. प अध्यक्षा दिपाली पाटोळे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व जिल्हा परिषदांचे सदस्य उपस्थित होते.

सुरुवातीला यावेळी आरक्षण सोडतीबाबात तरतुदींची माहिती देण्यात आली. ही सोडत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील तरतूदीनुसार विविध प्रवर्गांसाठी आरक्षणासाठी काढण्यात आली. 2011 ज्या जनगणनेनुसार आरक्षण काढण्यात आले. संबंधित जिल्ह्यांच्या ग्रामीण लोकसंख्येप्रमाणे उतरत्या क्रमाने प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले. तर चिठ्ठी टाकून महिलांचे आरक्षण काढण्यात आले.

विविध प्रवर्ग आणि त्यासाठी अध्यक्षपद आरक्षित झालेल्या जिल्हा परिषदा पुढीलप्रमाणे –

1. अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) – नंदुरबार, हिंगोली
2. अनुसूचित जमाती (महिला) – नांदेड ,पालघर, रायगड
3. अनुसूचित जाती (सर्वसाधारण) – सोलापूर, जालना
4. अनुसूचित जाती (महिला) – नागपूर, उस्मानाबाद
5. खुला (सर्वसाधारण) – अकोला, भंडारा, रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा
6. खुला (महिला) – पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर , जळगाव, अहमदनगर
7. नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) – कोल्हापूर, वाशीम, अमरावती, लातूर
8. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – ठाणे, वर्धा, बीड, सिंधुदुर्ग, सांगली

Visit : Policenama.com