शिवा संघटनेचे २०१८ चे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन –अखिल भारतीय वीरशैव युवक संघटने तर्फे ‘शिवा संघटना २०१८ राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत.

कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या निमित्त बीड येथील श्रीक्षेत्र कपिलधारा येथे दरवर्षी होणाऱ्या यात्रेमध्ये भव्य राज्यव्यावी वार्षिक मेळावा आयोजित केल्या जात असतो. याहीवर्षी गुरवार ( २२ नोव्हेंबर ) ला राज्यव्यापी वार्षिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

याच राज्यव्यापी वार्षिक मेळाव्या निमित्त शिव संघटनेने वीरशैव – लिंगायत समाजाच्या राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील मान्यवरांना शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार दिल्या जाणार आहे. शिवा संघटनेचे संस्थापक तसेच राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार जाहीर केले आहेत.

जाहीर झालेले पुरस्कार

शाहिद वीरजवान शुभम मुस्तापुरे यांना त्यांच्या आई वडिलांकडे शिवा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे.
माजी मंत्री हरिभाऊ नाईक – उत्कृष्ट जेष्ठ समाजसेवक शिवा पुरस्कार
कैलास जामकर , त्रिंबक स्वामी – उत्कृष्ट शिवकीर्तनकार पुरस्कार
मारोती कावडे , शंकर भालेराव , शिवानी स्वामी – उत्कृष्ट शिवगायक पुरस्कार
केशवअप्पा वैद्य -उत्कृष्ट हार्मोनियम वादक शिवा पुरस्कार
ज्ञानदीप वीरशैव भजनी मंडळ लातूर – उत्कृष्ट वीरशैव भजनी मंडळ शिवा पुरस्कार
अखंड शिवनाम सप्ताह कमिटी लातूर – उत्कृष्ट अखंड शिवनाम सप्ताह कमिटी शिवा पुरस्कार
अजय होनराव , निलेश महाजन , सुरज दिधाते – उत्कृष्ट शिवा सोशल मीडिया पुरस्कार
शिवा संघटना जिल्हा शाखा जालना – उत्कृष्ट शिवा संघटना जिल्हा शाखा पुरस्कार
शिवा संघटना तालुका शाखा लोहा , नांदेड – उत्कृष्ट शिवा संघटना तालुका शाखा पुरस्कार
शिवा संघटना शहर शाखा उल्हासनगर – उत्कृष्ट शिवा शहर शाखा पुरस्कार
शिवा संघटना गाव शाखा ( टेकाअर्जुनी चंद्रपूर ), शिवा संघटना गाव शाखा वाडी वडगाव उस्मानाबाद – उत्कृष्ट शिवा संघटना गाव शाखा पुरस्कार
संगमेश्वर कांबळे , गजानन स्वामी, – उत्कृष्ट शिवा कार्यकर्ता पुरस्कार
विठ्ठल खेळगी, बाळासाहेब स्वामी – उत्कृष्ट पत्रकार शिवा पुरस्कार
रेखाताई रावले वाशीम – उत्कृष्ट राष्ट्रनिष्ठ प्रदूषण मुक्ती अभियान शिवा पुरस्कार

विशेष म्हणजे या कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे, महादेव जाणकर, जयकुमार रावल यांच्या हस्ते सर्वाना गौरवण्यात येणार आहे.