आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ चे वेळापत्रक जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

२०१९ मध्ये इंग्लंड मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर झाले असून आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप इंग्लंडमध्ये पाचव्यांदा खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या आठ संघांनी विश्वचषक स्पर्धेत स्थान निश्चित केले आहे. वेळापत्रकानुसार ३० मे २०१९ रोजी सामन्यांना सुरुवात होईल तर १४ जुलै रोजी अंतिम सामना असेल.
[amazon_link asins=’B071FWPF3Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’36d9ef48-8f39-11e8-a682-75cba28233a9′]

या टूर्नामेंटमध्ये पहिला सामना 30 मेला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. या वर्षी 10 संघ वर्ल्डकमध्ये भाग घेणार आहेत. ओवलमध्ये हा सामना रंगणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रकेविरोधात साउथंप्टनच्या हँपशायरमध्ये होणार आहे.

1983 आणि 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकणारी टीम इंडिया 2019 च्या वर्ल्डकपची प्रबळ दावेदार मानली जात आहे. 2015 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचलेली टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वात हा वर्ल्डकप खेळणार आहे.

साउथेम्प्टन ( भारत, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान), बर्मिंघम (इंग्लंड आणि बांग्लादेश) आणि मॅनचेस्टर (पाकिस्तान आणि वेस्टइंडिज) यांच्यात 2-2 सामने या मैदानावर होणार आहेत. ओवलवर (ऑस्ट्रेलिया), नॉटिंघममध्ये (न्यूझीलंड) आणि लीड्स (श्रीलंका) यांचा एक सामना होणार आहे.
[amazon_link asins=’B01N0XQUHJ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3d80d06d-8f39-11e8-b67e-d9d0dd668fad’]

भारताचे सामने

5 जून : दक्षिण आफ्रिका (साउथेम्प्टन)
9 जून : ऑस्ट्रेलिया ( ओवल )
13 जून : न्यूझीलंड ( नॉटिंघम )
16 जून : पाकिस्तान (मॅनचेस्टर)
22 जून : अफगाणिस्तान (साउथेम्प्टन)
27 जून : वेस्टइंडिज (मॅनचेस्टर)
30 जून : इंग्लंड (बर्मिंघम)
2 जुलै : बांग्लादेश (बर्मिंघम)
6 जुलै : श्रीलंका (लीड्स)
9 जुलै : पहिली सेमिफाइनल (मॅनचेस्टर)
11 जुलै : दूसरी सेमीफायनल (बर्मिंघम)
14 जुलै : फायनल (लॉर्ड्स)
7 सामने डे-नाईट
संपूर्ण वर्ल्डकपमध्ये एकूण 7 सामने डे-नाईट होणार आहेत. पहिला सामना 2 जूनला ब्रिस्टल येथे ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार.