पोलादपूर घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखांची मदत जाहीर

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे शनिवारी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३४ पैकी ३३ जण ठार झाले आहेत. यामधील मृतांच्या नातेवाईकांना राज्य  सरकारकडून  प्रत्येकी ४ लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर यात जखमी झालेल्या व्यक्तीच्या उपचारांचा सर्व खर्चही सरकारकडून करण्यात येणार आहे.
[amazon_link asins=’B01769C4DI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e8a55902-9271-11e8-bf53-3dc223204ffd’]
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या खाजगी बसला अपघात झाला आहे. महाबळेश्वरला पिकनिकसाठी काही कर्मचाऱ्यांना घेऊन ही बस निघाली होती. पोलादपूर घाटातील सुमारे ८०० फूट खोल दरीत ही बस कोसळली. बसमध्ये दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचे ४० कर्मचारी होते अशी प्राथमिक माहिती होती. मात्र स्थानिक शिवसेना आमदार यांनी या बसमध्ये ३४ जण होते, त्यापैकी चालकासहित ३३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका मराठी वाहिनीला देताना समजली आहे. ही गाडी तीन टप्प्यात अडकत जात खाली पडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेतील सर्वजण दापोली यथील कृषी विद्यापीठातील असल्यामुळे दापोली बंद ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
प्रसंगावधान राखून एक जण बचावला
या घटनेमध्ये प्रकाश सावंत देसाई हे अपघातातून बचावले आहेत. प्रसंगावधान राखून त्यांनी बस मधून उडी मारली, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. बचावलेले दापोली येथील कृषी विद्यापीठाचे सहाय्य्क कृषी अध्यापक प्रकाश सावंत देसाई यांनीच या घटनेची माहिती कृषी विद्यापीठात जाऊन दिली. त्यानंतर वेगाने बचावकार्य सुरु करण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता पर्यंत १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले असून अजूनही मृतदेह काढण्यात येत आहे. या मृतदेहांचे पोस्टमार्टम झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्याकडे सोपवण्यात येतील. घटनास्थळी नातेवाईकांची गर्दी जमली आहेत.