‘रिपब्लिकन सेना’ वाढवण्याची घोषणा करत आनंदराज आंबेडकर ‘वंचित’मधून बाहेर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर वंचितमधून बाहेर पडले आहेत. यापुढे राज्यात रिपब्लिकन सेना वाढवणार असं म्हणत त्यांनी वंचितमधून बाहेर पडल्याची घोषणा केली आहे. लोकसभा आणि विधानसभेत वंचितला अपेक्षित यश मिळालं नाही असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आनंदराज आंबेडकर म्हणाले, “आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. आज आंबेडकरी चळवळीतील आनंदाचा दिवस आहे. चौदा वर्ष लढा देणाऱ्या जनेतला मी धन्यवाद देतो. आंबेडकरी जनतेला सत्तेपर्यंत घेऊन जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यासाठी रिपब्लिकन सेनेची नव्याने उभारणी करत आहोत. अनेक लोक रिपब्लिकन सेनेला येऊन जुडत आहेत.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “आत्ताच आम्ही रिपब्लिकन सेनेची महाराष्ट्रातीची कमिटी जाहीर केलेली आहे. त्यात सागर डबरासेन अध्यक्ष तर कुमार कुरतडकर याच्या नावाची सचिव म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –