धक्कादायक ! एक्स बॉयफ्रेंडच्या त्रासाला वैतागून तरुणीने कापले त्याचे ‘गुप्तांग’

पोलिसनामा ऑनलाईन – बॉयफ्रेंडच्या ब्लॅकमेलिंगमुळे त्रासाला वैतागलेल्या तरुणाीने धक्कादायक पाऊल उचलत त्याचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुप्तांग कापल्यानंतर त्याला एका खोलीत बंद करुन ठेवले होते. तो वेदनांनी कळवळत असतानाही तिने त्यावर दया दाखवली नाही. ही घटना पाकिस्तान मधील लाहोरमध्ये घडली आहे.

लाहोरयेथील हरबंशपुरा भागात या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. आरोपी तरुण तरुणीला खूप त्रास देत होता. तो तिला ब्लॅकमेलही करीत होता. त्यामुळे तरुणी खूप वैतागली होती. आणि यातूनच तिने हे पाऊल उचलले आहे. प्रकरणात पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत तो पहिल्यांदा वेहारी जिल्ह्यात राहत होता. आणि 6 महिन्यांपूर्वी तो लाहोरला आला होता. त्याचे आरोपी तरुणीसोबत शारीरिक संबंध होते. ही तरुणीदेखील गेल्या 18 वर्षांपासून याच भागात राहत होती. तरुणीने त्याला फोन करुन त्याला एका जागेवर बोलावले. त्यानंतर हत्याराने त्याच्यावर हल्ला केला. त्याचे गुप्तांग कापून एका खोलीत डांबून ठेवले. बंद खोलीत तरुण बराच वेळ ओरडत होता. त्यानंतर शेजार्‍यांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदविला आहे. त्याशिवाय घटनास्थळाहून काही पुरावे गोळा केले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like