प्रणिती शिंदेंना मंत्रिपद नाही मिळालं, ‘नाराज’ कार्यकर्त्यानं रक्तानं माखलेलं पत्र सोनिया गांधींना लिहीलं

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार तर झाला परंतु काँग्रेसच्या लागोपाठ तीनदा आमदार झालेल्या प्रणिती शिंदेंना मंंत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या सोलापूरातील युवा काँग्रेस जिल्हाध्यक्षाने प्रणिती शिंदेंना मंत्रिपद मिळावं अशी मागणी करणारं पत्र आपल्या रक्ताने लिहिली आहे. हे पत्र सोनिया गांधी आणि राहुल गांधींना पाठवण्यात आले आहे.

प्रणिती शिंदेंने यांनी मंत्रिपद न मिळल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी आता पक्षाच्या राजीनाम्याचे शस्त्र उपसले आहे.

युवा काँग्रेस जिल्हाधक्षांनी सांगितले की प्रणिती शिंदे यांना पक्षाकडून मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली नाही. तिसऱ्यांदा आमदार होऊ देखील त्यांना मंत्रिपदाची संधी नाकारल्याने आपण नाराज आहोत.

यावर बोलताना प्रणिती शिंदेंनी सांगितले की आपण कार्यकर्त्यांची समजूत काढणार आहोत. मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज नाही, पक्षाचा निर्णय मला मान्य आहे. कार्यकर्त्यांना पक्षाचे राजीनामे देऊ नये यासाठी मी त्यांना समजावेल. जनसेवा महत्वाची आहे. मी पक्ष बांधनीचे काम करत राहिलं, परंतु पक्षावर अजिबात नाराज नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/